akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

गरिबी

गरिबी

2 mins
326


जेम्स बॉण्ड ला त्याच्या भारतीय मित्राने महिन्या आधीच आपल्याकडे दिवाळी साठी आमंत्रण पाठवले आणि जेम्स बॉण्ड दिवाळीच्या आधी दोन दिवस भारतात आपल्या मित्राकडे पोहोचला त्याचे स्वागत हि भारी करण्यात आले घरात चालेली तयारी आकाशकंदील बनविणे रोषणाई सजावट त्याचबरोबर निरनिराळ्या तयार होत असलेल्या फराळाचा वास हे सर्व पाहून तो भारावला त्याने हि थोडी मदत केली. 

दिवाळी चा दिवस उजाडला पारंपरिक रित्या दिवाळी ची पूजा आणि फराळ झाला आता सगळे तयारी करू लागले लक्ष्मी पूजनाचा संध्यकाळाचा मुहूर्त होता संध्यकाळी चार वाजता सगळी पूजेची तयारी करण्यात आली एका मोठ्या ताटात काही पैश्याच्या नोटा ठेवण्यात आले होते ते पाहून जेम्स ने आपल्या मित्राला प्रश्न विचारला त्यावर तो मित्र म्हणाला ह्या नोटा ठेवण्यामागचे कारण कि देवी लक्ष्मी हि धनाची देवता आहे ह्या दिवशी सगळे घरात आपल्या कामाच्या ठिकाणी देवी लक्ष्मी ची पूजा करताना जेणेकरून आपले घर नेहमी आर्थिक रित्या चांगले चालावे आपले कामात बळकत यावी पैशाची चणचण भासू नये घर सुख आणि समाधानाने भरून जावे. गरिबी ची झळ बसू नये 

संध्यकाळच्या सात च्या मुहूर्तावर भटजी च्या आदेशानुसार पूजा सुरु झाली. पूजे नंतर सह कुटुंब आरती करण्यास उभे राहिले आरतीत प्रत्येक जण मग्न होता. आरती झाल्यावर सगळे देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपले सांगणे देवीला सांगत होते जेम्स हि काही मागे नव्हता. त्याने हि सगळ्या प्रमाणे देवी समोर हात जोडले आणि डोळे मिटून उभा राहिला. तेव्हड्यात त्याचा मित्र प्रसाद वाटत होता जेम्स ने डोळे उघडले हे' पाहता त्याला प्रसाद देत त्याच्या मित्राने जेम्स ला विचारले "काय जेम्स एव्हडं काय मागत होता देवीकडे "?

हसत हसत जेम्स म्हणाला "आणि काय मागणार माझी हि आर्थिक परिस्थिती अजून सुधारु दे गरिबी ची झळ मला नको आहे "

हे ऐकताच जेम्स चा मित्र मनातल्या मनात हसला आणि तो स्वतःशीच पुटपुटला "कोट्यधीश हा आणि कसली आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे ह्याला म्हणे गरिबीची झळ नको "


Rate this content
Log in