घेण्यार्याचे हात
घेण्यार्याचे हात
घेण्यार्याचे हात!
बँकेत गेली असता, नेहमीच्या काऊंटरवरचे काका वेगळ्याच अवतारात दिसले, पांढरी दाढी व केस वाढलेले... नेहमी पेक्षा खुप वेगळे व खुप चिंतेत आहे असे वाटले...
खरे तर मी त्यांना ओळखलेच नव्हते... त्यांनीच मॅडम म्हणुन हाक मारली..आवाज ओळखीचा वाटला..
हाय-हॅलो झाल्यावर मी त्यांना विचारले..ठीक आहात न..
त्यांना कळले, मी काय विचार ते...
ठीक आहे सगळे... हा गेट अप... एका शॉर्ट फिल्म साठी आहे...
थोडक्यात त्यांनी माहिती दिली फिल्मची व त्यांच्या त्यातल्या 'रोल' ची..
डोळ्यात पाणीच आल.. आलेल पाणी हळुच लपवल व बोलायला परत सुरवात केली...
एका वेगळ्याच समाजातल्या वाईट गोष्टींची ओळख झाली..
आपल्याला पण ह्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे... निदान ओळखीतल्या, न ओळखीतल्यांना ह्या गोष्टी करतांना थांबवण्यासाठी काही करता आलेतर नक्की करेल असे मनातच ठरवले.
आपण किती सुरक्षीत जगात जगतो... आपल जग छोट आणि सर्व कस आनंदी असत... मनातच आई-बाबांना धन्यवाद दिले...
ह्याच विचारांनच्या संगतीने घरी आले..
मन बैचेन होत.. घरी बाबांशी बोलतांना शॉर्ट फिल्मचा विषय त्यांना सांगितला व बँकेतल्या ते काका त्यात कोणती भुमिका करणार आहे हे ही सांगितले...बाबाही त्यांना ओळखतच होते...
मग बाबांनी पण काही त्या
ंना माहित असलेले अनुभव सांगितले..
कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाला जायच कि नाही हा विचार मनात येत होता... आहोच इथे तर जाऊ अस मी ठरवल.
बाबांनाही यायची इच्छा होती,सोबत गेलो,उशिरा गेलो..
स्नान व्यवस्थित झाले...
माझे लक्ष्य पोलिस, स्वयंसेवक करत असलेल्या घोषणेकडे असायच...माणसांची नावे घेऊन हरवले...मिसिंग अशी घोषणा झाली कि उगाच मनात शंका येत होती...
कारण नंतर हीच हरवलेली अशी भासवलेली माणसे...हो भासवलेलीच...
खरे कारण...कुटुंबाला नको असलेली माणसे ... कुटुंबासाठी नेहमी करताच हरवतात व नंतर हिच हरवलेली माणसे गंगेच्या किनारी,जागा मिळेल तीथे...आसरा शोधत फिरत राहतात...
कोणी दाता अन्न देतो त्यावर कधी जगतात कसे बसे.वस्त्र दिले ते लपेटतात...कधी गंगेच्या पाण्यावर आंघोळ केलीतर करतात...
काही त्याही परीस्थीत आनंदी राहतात तर कोणी चोरी चपाटी...
वयाचे बंधन नसते, अगदी तान्ह बाळ ते जखड्ड म्हातारे...
कोणी धष्टपुष्ट तर कोणी आजारी..
प्रत्येकाची ' स्टोरी' वेगळी...
घेण्यासाठी असे लाहान मोठे हात समोर आले की विचार मनात येतो कुठून आले, तयार झाले असतील भिकार्या सारखे जिवन जगण्यास?
काहींना आधार मिळतो ह्यातुन सावरतांना तर कोणी दुषणं देत राहतं आपल्या कर्माला...