Akshata alias shubhada Tirodkar

Others

2  

Akshata alias shubhada Tirodkar

Others

एका नाण्याच्या दोन बाजू ...

एका नाण्याच्या दोन बाजू ...

3 mins
725


"काय झालं सावनी अशी गप गप का आहेस? काय झालंय ? मघाशी जेवतांना सुद्धा तू काहीच बोलीस नाही मी तुला असं नाही ग पाहू शकत काय झालं ते सांग तरी?" आपल्या प्रेमापोटी सौरभ सावनीची विचारपूस करत होता.

"काही नाही रे सहज" सावनी उतरली.

"काय सहज तूच गप राहणं अशक्य नेहमी मी ऑफिस मधून आल्या नंतर तुच्याकडे एवढ्या गोष्टी असतात सांगायला आज एकपण नाही इम्पोस्सिब्ल सावनी तूच काही तरी बिनसलंय घरी कुणी काही बोल का?''.

"नाही रे" आणि सावनी रडू लागली.

"अग हे काय रडतेस कशासाठी काय झालं सांग तरी मला कस कळेल हे अश्रू कशासाठी आहे ते प्लीझ सांग ना".

"हे बघ सौरभ तू उगीच गैरसमज करून घेऊन नकोस पण आज आईच्या बोलल्या त्या मला नाही आवडलं तूला माहित आहे ना आज पर्यंत ह्या एक वर्षात कधी हि आईना मी संधी दिली नाही कि त्या तुला माझ्या बदल काही वाईट बोलतील मला कामाची सवय नव्हती किचन हे माझ्या लिस्ट मध्ये नव्हतं पण लग्नानंतर मी अड्जस्ट केलं शिकले जे मी कधी केलं नाही ते केलं किचनला आपलस केलं एव्हडं करून जेव्हा कोणी बोलत तेव्हा वाईट वाट ना अरे आज मी ऑफिस मधून आले फ्रेश होऊन सरळ किचन मध्ये घुसले आज एक चपाती माझ्या कडे थोडी जळाली  तर आई म्हणाल्या काम खूप केली म्हणून  होत नाही रीत असायला हवी काही केलं म्हणून नाही होत शिस्त असायला हवी आवड असायला हवी. संसार करणं म्हणजे असच नाही ते केला तर संसार नाही तर गेला उडत आणि असचाच संसार करणार आहे का मी असाच संसार नाही केला उगीच तुला सांगतले चपाती करायला मीच केली असती तर हि जळालीच नसती".

"आता तूच बोल एव्हडं बोलणं गरजेचं होत का".

आय नो सावनी तू दुखावलीस पण तुला माहित आहे ना आईला नेटनेटकं आवडत आणि तिचा स्वभाव तसा वाईट नाही ग पण तिला राग आला कि ती पटकन बोलून जाते सो आपण तिला नाही ना बदलू शकत सो तू इग्नोअर कर.

सौरभ मी आईना वाईट नाही म्हणत आहे रे मान्य आहे त्याना राग येतो पण आपण एवढे चांगले वागून जेव्हा कोणी आपल्याला असे टोचून बोलले तर लागतंच ना मला तुला हे नाही सांगायच होत उगीच तुमच्यात गैरसमज नको मला उगीचच कोणाशी वाईट वागायचं नाही आहे पण आज मी खूप दुखावले म्हूणन माझं मन लागत नव्हतं". "चल आजीकडे जाऊया तिच्याशी बोलल्यावर तुझे मन लागेल "."बघ हे नको उगीच आजींना कशाला त्रास ह्या सर्वांचा "."अग तसं काही नाही मी पण कधी अस्वस्थ वाटत असेल तर तिच्याशी बोलतो तिच्याशी बोलुन खरंच छान वाटत आणि ती ह्या गोष्टी कोणाला सांगणार नाही"( ते दोघे आजीकडे जातात सौरभ आजीला झालेल्या प्रसंगाची कल्पना देतो तशी आजी त्यांना म्हणते) "सासू सुनेचं नातं हे एका नाण्याच्या दोन बाजू सारखं असत ह्या दोघांमुळे घराला घरपण असत. तर तंटेपणा पणअसतो.लग्न झालं कि ह्या नात्यात दोन्ही बाजूनी समजुतदारपणा असायला हवा.नवी आलेली मुलगी घरात अड्जस्ट व्हायला थोडा वेळ लागेल ना. आवड निवड राहणीमान सगळ्या बरोबर मिसळायला थोडा वेळ लागेल ना. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात अड्जस्ट करणं खूप कठीण काम असत तिला थोडं समजून घ्यायला हवं तरच ती नव्या वातावरणात चांगली रुळेल".

"तसेच नव्या आलेल्या मुलीने घरातल्या लोकांशी आदराने वागायला हवे .तीच घर नाही पण आपल्या स्वभावाने ते घर आपलंस करू शकते. सासू कधी आई बनू शकत नाही आई ती आईच असते पण सासरी थोडीच आई असते पण सासू मैत्रीण तरी बनू शकते ना. हा विचार दोन्ही बाजूनी व्हायला हवा तरच घरात सुखशांती आणि आपलेपणा वसतो एका स्त्रीनेच एका स्त्रीला समजून घ्यायल हवं आणि हो तुच्या सासूवर मी लक्ष ठेवीन तिला पण थोडा डोस देईन".

खरच आजी तुमच्याशी बोलून मला बर वाटलं.

" सांगितले ना तुला मी सावनी कि माझी आजी ग्रेट आहे म्हणून".

"पळा आता तुच्या आईने जर पहिले तर म्हणेल नातू आणि नातसुनेबरोबर कसली मीटिंग चालली आहे म्हूणन" आणि दोघेही हसत हसत आजीच्या रूममधून बाहेर पडले.


Rate this content
Log in