Sunita madhukar patil

Others


5.0  

Sunita madhukar patil

Others


एक दुजे के लिए.❤

एक दुजे के लिए.❤

2 mins 522 2 mins 522

गुलाबी रंग त्याच्या आवडीचा 

म्हणुन...

ती आज छान त्याच्या आवडीची साडी नेसली होती

गुलाबी रंगाची...

खात्री होती तिला आज तो नक्की प्रपोज करेल.

तो ही तिच्या आवडीचा निळा शर्ट घालून आलेला.

त्याची एन्ट्री एकदम हिरो स्टाईल मध्ये

हातात फुलांचा गुच्छ

त्याला पाहताच तीची कळी खुलली...

नजरेनी नजरेचा ठाव घेतला 

आणि 

शब्द मौन झाले...

हळव्या मनाच्या व्याकुळ भावना 

मग दोघांनी नजरेनीच टिपल्या.

शब्दांची गरजचं भासली नाही.

मग काय दोघे हातात हात घेऊन मावळत्या सूर्याच्या साक्षीने...

हम बने तुम बने, एक दुजे के लिए स्टाईल मध्ये

सापनों मे खो गये...

दोघांनी लग्न करण्याचा विचार केला आणि

दोघांच्या ही घरी तुफान आ गया...

लव्ह स्टोरीमध्ये व्हिलन शिवाय मजा नाही.

पण आपले हिरो हिरोईन पण काही कमी नव्हते.

दोघे ही आपल्या निश्चयावर ठाम...

मग काय दुश्मन को हथियार डालने ही पडे.

आणि दोघांचं लग्न ठरलं, लग्नाच्या दिवशी

नऊवारी साडी, डोक्यात गजरा,

डोळ्यात काजळ, गालावर लाली...

पाहून, हिरो एकदम फिदा...

एकदम खल्लास...

तिचं ते रूप त्याने नजरेत साठवलं.

एक आठवण म्हणून.

आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडलं.

आज पहिल्यांदाच "आनंद" वृद्धाश्रमात सनईचे सूर वाजले होते.

" आनंद " वृद्धाश्रमात आनंद ओसांडून वाहत होता.

साठे आजी आणि कुलकर्णी आजोबा आज

मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी बनले होते.

आणि आयुष्याची सेकंड इनिंग सुरू केली होती.

काय ? समजलं की नाही तुम्हाला अजुन

अहो आपला हिरो म्हणजे कुलकर्णी आजोबा वय वर्ष 70

आणि साठे आजी होरोईन वय वर्ष 65.

एक आयुष्याची संध्याकाळ अंधाराच्या गर्तेत हरवण्या आधी मोहरली होती, बावरली होती छान हसत होती.

उतार वयात थकल्या भागल्या शरीराला एक भावनिक आधार हवा असतो. मुलाबाळांच्या किलबिलाटात हरवून जावे असे वाटते. लेका सुनांचे चार चांगले शब्द कानी पडावे असे वाटते. आजारपणात डॉक्टरांच्या औषधासोबत प्रेमाच्या चार बोलाने मनाला उभारी मिळावी. आयुष्याची संध्याकाळ सुखासमाधानाने, मानसन्मानाने जावी एवढीच इच्छा असते. पण याच वेळी त्यांना नेमका वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवण्यात येतो. मग कस जगायचं. भावनिक आधारच हरवलेला असतो. 

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच साथीदारांची गरज असते. आयुष्याच्या जोडीदाराची साथ गमावल्यानंतर शेवटच्या श्वासापरर्यंत साथ निभावण्यासाठी कोणीतरी हवंच ना.

मुलाबाळांनी एक अडगळीची वस्तू म्हणून वृद्धाश्रमात आणून टाकल्यानंतर साठे आजी आणि कुलकर्णी आजोबांना धड मोकळा श्वास ही घेता येत नव्हता. आपण कुठे चुकलो, एक आई वडील म्हणून कुठे कमी पडलो म्हणुन मुलांनी हा असा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. हेच सगळे विचार त्यांच्या मनात थैमान घालत होते. ह्यासागळ्यातच दोघे एकमेकांची सुखदुःख वाटून घेऊ लागले. एकमेकांना समजून घेऊ लागले. दोघांना एकमेकांचा आधार वाटू लागला. एकमेकांची काळजी घेऊ लागले. आणि मग त्यांनी ही आयुष्याची संध्याकाळ एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनाही त्यांनी निक्षून सांगितलं ज्या क्षणी तुम्ही आम्हाला इथे वृद्धाश्रमात आणून टाकलं त्या क्षणी तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढील आयुष्य आम्ही आमच्यासाठी जगणार आमच्या शर्थींवर.

आणि आज साठे आजी आणि कुलकर्णी आजोबा मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी बनले होते.

आता ते दोघे शेवटच्या श्वासापर्यंत असणार होते एक दुजे के लिए...❤Rate this content
Log in