Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy

3.3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy

" दूरदर्शन "

" दूरदर्शन "

6 mins
188


ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण कुटुंबामध्ये मी जन्माला आलेलो एक सर्वसामान्य मुलगा ! शिक्षण गावात झेडपीच्या शाळेत घेत असताना इयत्ता दहावी पास झाल्यानंतर आठवीत परगावी प्रवेश घेतला . खेडयातील शाळेत प्रवेश घेणे म्हणजे ? एकदा प्राथमिक शाळेत आईवडिलांनी नाव टाकलं कि शिक्षण संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची ॲडमिशनची किंवा इतर क्रिया करण्याची गरज नसायची .सर्वकाही आपोआप होत .मी सातवी पास झालो . आणि सातवीत केंद्र परीक्षा तालुक्याच्या गावी असायची शाळांचे एक केंद्र असून केंद्रस्थानी परीक्षा असल्यामुळे त्या काळामध्ये इयत्ता दहावी परीक्षेला जसे महत्त्व दिले आहे . त्याप्रमाणे इयत्ता सातवी ला त्याकाळी महत्त्व होते . आम्ही सातवी मध्ये साधारण एका वर्गामध्ये वीस ते बावीस मुले होतो . तेंव्हा गावात पहिल्यांदा वीज पोचली होती . वीजेचे खांब रस्तात्वर असणाऱ्या तारा त्यांचे काम चालू होते . त्यानंतरच साधारणता सहा महिन्यांनी कोटेशन भरल्यानंतर मंजूर होणे व वीजपुरवठा सुरू होईपर्यंत दोन तीन महिन्याचा कालावधी गेला . आणि एक दिवस घरामध्ये प्रथमता वीजेवरचा पिवळा बल्प पेटला . त्या लाईटा 


खाली अभ्यासाचा आनंद मिळायचा . तो आज घरामध्ये सर्व प्रकारची सुविधा असतानासुद्धा मिळणार नव्हता. त्या लाईटाच्या प्रकाशात अभ्यास करून केंद्र परीक्षा देण्यासाठी आम्ही केंद्रात पोचलो !तीन दिवस जाणे आणि येणे अशा पद्धतीने आमची परीक्षा पार पडली . नंतर मात्र गावामध्ये माध्यमिक शाळा नसल्याने इतर गावांमध्ये जाण्याचा विचार केला .ते आमच्या गावा मध्ये एका मोठ्या कुटुंबात एका मोठ्या व्यक्तीच्या मुलाला लग्नामध्ये एक भला मोठा दूरदर्शन संच मिळाला होता. तो बघण्यासाठी गावातील सारी मुले त्या घराभोवती गर्दी .त्या दूरदर्शन संच यासाठी लागणारा अँटेना हा सुमारे तीस ते चाळीस फूट उंच छतावर बसवावा लागे व त्या अँटिना च्या काड्या दोन-दोन ,तीन-तीन मीटरची असत ती वाऱ्याने हलू नये म्हणून आजूबाजूला तंबू प्रमाणे तंग दिले जात . त्या काळामध्ये दूरदर्शन वर रामायण ही मालिका सुरू झाली होती. जेव्हा रामायण मालिका सुरू होती तेंव्हा मात्र त्या घरामध्ये बसण्यासाठी जागा मिळत नसायची . अर्धा तास आधी जागा सांभाळण्यासाठी मुलांची गर्दी होत . शेवटी त्या घरातील माणसांनी जागेअभावी रामायण मालिका सुरू होणे आधी अर्धा तास बाहेर गल्लीमध्ये एका कोपऱ्याला दर्शन संच ठेवत .त्यामुळे साधारणत दहा वीस फुटावर बसलेल्या व्यक्तींना फक्त त्या दूरदर्शन चा आवाज कानी पडत असे . लांबून फक्त चित्र दिसत असे . चित्रावरून लिंक लागून ती मालिका बघायची कारण पूर्ण खेडेगावांमध्ये एकच असल्यामुळे गर्दी खूप होती . तेंव्हा मात्र दूरदर्शनचा घेतलेला आनंद आज सर्वांच्या स्मरणात आहे . दूरदर्शन प्रक्षेपण साधारणता सकाळी सुरू होत व रात्री 10 पर्यंत बंद होत बातम्याही दिवसात दोन वेळा दिल्या जात . व त्याही महत्त्वाच्या असल्यामुळे कोणताही पांचटपणा , अतिशयोक्ती नसल्याने अर्धा तासात सर्व समाचार संपवला जात असे त्यामुळे दूरदर्शन वर आलेली बातमी , विषय , सत्यता , व विश्वास !सर्व समाजामध्ये पक्का रुजला होता .


टीव्ही वर आलेली बातमी ही नेहमी खरी आणि 100% सत्य असल्यामुळे प्रेक्षकांचा दृष्टीकोण अतिशय विश्वास युक्त होता. व त्या वरच्या मालिका दाखवल्या जात त्या मालिकांमध्ये समाजांमध्ये घडणाऱ्या सत्य घटना ! प्रबोधन पर अशा कथा . दाखवल्या जात .त्या कथांद्वारे अगदी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत चांगला हेतू ठेवून त्या मालिकांचे प्रसारण केले जात . त्या कथा जणू जीवनाच्या बोधकथा असत . प्रेरणादायी असल्यामुळे परिवार आपली सारी कामे सोडून आनंद घेत असत. आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टी गोष्टी व कोणत्याही प्रकारचे निसर्गसौंदर्य हे फक्त ब्लॅक व्हाईट या दोनच रंगांमध्ये दाखवले जात होते . तरीही ते सौंदर्य बघण्याचा आनंद हा काही वेगळाच होता . अचानक जर वातावरणात वादळ सुटले .अँटिना हल्ला की त्याची दिशा बदलत त्यामुळे टीव्हीवर प्रक्षेपण व त्यावर मुंग्या आल्या प्रमाणे दिसत .मग ?काही व्यक्तींनी छतावर जाऊन अँटिना फिरवणे व खाली काही व्यक्तीने टीव्ही संच या कडे बघून चित्र आले आले ! गेले गेले ! असा निरोप पोहोचणे . साधारणतः अर्धा एक तासात प्रयत्न केल्यानंतर टीव्हीवर चित्र दिसू लागत तेव्हा झालेला आनंद सांगण्या पेक्षाही उपभोगलेला आनंद व मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वर्ग सुखाचा आनंद वाटत होता . आणि कामा व्यतिरिक्त तर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती ? अतिशयोक्ती .करून दाखवल्या जात नव्हत्या . आहे ते प्रॉडक्ट .उद्योगाचं कसा आहे . योग कसा करावा . याविषयीच कोण त्याही जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या . अति कमी प्रमाणात त्यामुळे दर्शन विषयी असणारे प्रेम ! व त्यामध्ये असणारे विशिष्ट प्रकारची संगीत ! बातम्या संपल्यानंतर चे संगीत ऐकल्यानंतर आजही वाटते कि बातम्या सुरू झाल्या आहेत. अशा ह्या दूरदर्शनची व्यथा आणि कथा ही जणू घरातल्या रोजच्या जीवनातील घडणाऱ्या घटनेप्रमाणे घडत . त्या काळामध्ये ज्या घरा मध्ये दूरदर्शन संच असायचा ती मोठी आणि श्रीमंत व्यक्तीच घेऊ शकत होत्या . सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. मात्र आज घरामध्ये 25 वर्षानंतर 'एलईडी ' टीव्ही बघत असताना व रिमोटचे बटन दाबत असताना जनु ब्लॅक व्हाईट जगामध्ये गेल्याचा भास झाला . जणू स्वर्गातून पृथ्वीतलावर व तेथून पाताळा मध्ये गेल्याचा भास झाला.आणि समोर रंगीत चित्र त्याची एच डी डिश ,बॉक्स , अँटेना काळानुरुप किती बदल झाला ! पूर्वीचा दूरदर्शन संच म्हणजे लांबी-रुंदीने एक मोठा बॉक्स !ज्याला घरामध्ये फार मोठी जागा लागत .एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी निदान एक दोन व्यक्ती शिवाय घटना घडत नव्हती . व बंद चालू करण्यासाठी बटनांचा वापर करावा लागत असे.आज हातामध्ये रिमोट आल्याने व या दूरदर्शन वर इतक्या प्रकारच्या वाहिन्या . इतक्या प्रकारचे चॅनल्स . असल्याने कार्यक्रमांचा शोध घेण्यासाठीच निम्मा अधिक वेळ खर्च होतो. त्यामध्ये दाखवल्या जाणार्‍या जाहिराती मध्ये आधुनिकतेचा बुरखा पांघरलेले कुटुंब ,स्त्रियांचे मादक स्वरूप दाखवले जाते . त्यामध्ये विविध प्रकारची लफडी ! एकाच घरामध्ये तीन प्रकारची लफडी करणारी व्यक्ती !आणि विशिष्ट कालावधीमध्ये मालिका दाखवल्या जातात .


महिलावर्ग दुपारी मोकळा असल्या कारणाने त्यावेळी मालिका व त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती यांना बळी पडून त्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो . परिणाम ? त्याचे दुष्परिणाम कुटुंबावर व कुटुंबातील व्यक्तींवर होतात . म्हणजे एकत्र कुटुंब. सहकुटुंब आनंदाने , सामोपचाराने , एका विचाराने , राहणारी कुटुंब ! त्या कुटुंबांमध्ये मतभेद सुरू झाले . व ह्या आभासी दुनिया मध्ये जगणारी दुनिया ! ही केवळ नाटकी व तात्पुरत्या स्वरूपाची . ज्या मालिका दाखवल्या जातात त्या बघणा त्याचा दृष्टीकोण असा निर्माण केला जातो . की दूरदर्शन वर ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्यात .व त्या घडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले जातात . त्यामुळे आजच्या पिढीमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत . ज्याला आपण स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद होत होता .आज अस वाटू लागल की सुविधा आणि त्याचा झालेला विकास ! आजचा दूरदर्शन संच हा लांबी-रुंदीने , वजनाने ,अतिशय कमी झाला . पण ? त्यातून बाहेर पडणारे विचार ' आचार , आणि सत्य ; यावर अविश्वास निर्माण झाल्यासारखा वाटू लागला. व दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी केवळ टाइमपास म्हणून दाखवल्या जातात .त्यामुळे दृष्टिकोन बदलला . वृत्ती ही बदली .व आज दूरदर्शन संच मानवी जीवनासाठी व मुलांसाठी एक "एडिट बॉक्स" बनलेला दिसतो . केवळ कर्तव्यात कसूर करणे . भ्रष्टाचार ;खोटेपणा , अहंकार , मीपणा , यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जाणारा दूरदर्शन संच म्हणजे ?आज मानवाला एक 'शाप ' ठरत आहे. जीवनामध्ये स्वर्गाचा आंनद नरक झाल्याचा अनुभव !प्रत्येक व्यक्ती घेत असतो . मात्र मानव आज इतका अगतिक झालेला आहे की तो काही करू शकत . नाही. तो ज्या फांदीवर बसलेला आहे तीच फांदी तो स्वतःच्या हाताने तोडत आहे .त्याचे दुष्परिणाम व धोके कशी असतील याची कल्पना त्याला जेंव्हा येईल तेंव्हा तो खड्ड्यात पडलेला असेल ! व द्याडाची फांदी तुटलेली असेल . तेव्हा त्याला कळेल कि दूरदर्शन संच हा विज्ञानाला एक 'शाप ' ठरावा . माझ्या जीवनामध्ये तो ठरला आहे . असा भास झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही .विकासाचा टप्पा कि अविकासाचा विचार तुम्हीच ठरवा त्याची कथा  "दूरदर्शन " संचाची व्यथा की कथा....


Rate this content
Log in