दुःख...सुख...स्वप्न...ध्येय...नि मंदिर...
दुःख...सुख...स्वप्न...ध्येय...नि मंदिर...


दुःख आपलं मंदिराच्या सुंदर कळसासारखं असावं
जो महत्वाचा, शोभेचा असतो पण पाया मात्र नसतो
ज्याचा मान असतो पण भक्कम आधार मात्र नसतो
सुख आपलं मंदिराच्या मोठया गाभाऱ्यासारखं असावं
जो क्वचित प्रेमाने फुलतो पण अवजड मात्र नसतो
ज्याचा सन्मान असतो पण अवमान मात्र नसतो
स्वप्न आपलं मंदिराच्या मोहक मूर्तीप्रमाणे असावं
जी दिसायला गोजरी असते पण अविश्वासी मात्र नसते
जिचा थाट बोलका असतो पण प्राण मात्र मुका नसतो
ध्येय आपलं मंदिराच्या भिन्न पायऱ्यांप्रमाणे असावं
ज्या असंख्य असतात पण अर्थहीन मात्र नाही
ज्यांचा मार्ग कठीण असतो पण अशक्य मात्र नसतो