Sunita madhukar patil

Others

5.0  

Sunita madhukar patil

Others

दत्तक आजी आजोबा

दत्तक आजी आजोबा

2 mins
401


या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


आजीच्या कुशीत निवांत निजलेल्या ऋग्वेदला पाहून अवनी आणि अजयच्या डोळ्यात पाणी तरळलं. काल 14नोव्हेंबर ऋग्वेदचा वाढदिवस आणि बालदिनसुद्धा,अशा या शुभदिनी अजय आणि अवनीने ऋग्वेदला जगातील सर्वात मौल्यवान गिफ्ट दिलं...!!!


अजय आणि अवनी अनाथाश्रमात वाढलेले आईबापाच्या प्रेमाला पोरके त्यामुळे आजीआजोबांच्या प्रेमाची ऊब तर ठाऊकच नाही.त्यांना ऋग्वेदला या सगळ्या सुखापासून वंचित ठेवायचं नव्हतं म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला आजीआजोबा दत्तक घेण्याचा...आणि काल त्याच्या वाढदिवशी त्यांनी त्याला एक अनमोल भेट दिली...आजीआजोबा!!!


एका वृद्ध जोडप्याला हक्काचं घर मिळालं,अजय-अवणीला आईबापाचं प्रेम तर ऋग्वेदला आजीआजोबांच्या मायेची ऊब...आजीआजोबांना पाहून ऋग्वेदच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव तर अविस्मरणीय होते.त्याची तुलना जगातील कुठल्याच सुखाशी होऊ शकत नव्हती.ऋग्वेदच्या वाढदिवशी असाहा अविस्मरणीय बालदिन साजरा झाला होता.


दत्तक आजी आजोबा ही संकल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटते नाही...पण काय हरकत आहे. वयाच्या ज्या टप्प्यावर त्यांना सगळ्यात जास्त आधाराची गरज असते , काळजीची गरज असते त्याच टप्प्यावर त्यांना वृद्धाश्रमाची पायरी चढवली जाते.ज्या आईबापांनी आपल्या पिल्लांना मोठे करण्यासाठी आपल्या चोचीतला घास त्यांच्या चोचीत भरवलेला असतो.आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालून स्वप्नांचा बळी देऊन त्यांना वाढवलेल असत.त्याच मुलांना ते म्हातारपणी जड वाटू लागतात...एक आईबाप चार-चार , पाच-पाच मुलांना अगदी आनंदाने वाढवत असतात , त्यांचं संगोपन करत असतात...पण चार पाच मुलांमध्ये एक आई बाप जड वाटू लागतात...त्यांच्या उतारवयात त्यांना वृद्धाश्रमात सोडून जिवंतपनीच त्यांना मरण यातना भोगायला भाग पडतात...


अजय आणि अवनी सारख्या लोकांना विचारा आई बापाची किंमत...


अजय!!! आईबाबा लहानपणीच देवाघरी गेले आणि तो आईबापांच्या प्रेमाला पोरका झाला. नातेवाईकांनी त्याला अनाथाश्रमात टाकले...तर अवनी ला ती एक महिन्याची असताना कोणी तरी अनाथाश्रमाच्या दारात सोडून गेले हॊते...ते दोघे आईबापांच्या प्रेमा विना अनाथाश्रमात वाढले...त्यामुळे त्यांना आजीआजोबाच्या प्रेमाची ऊब तर ठाऊकच नव्हती...


ते दोघे अनाथाश्रमातच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला...


लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या संसाराच्या वेलीवर ऋग्वेद नावाचं फुल उमललं. तो हळूहळू मोठा होत होता. आता तो शाळेत जाऊ लागला होता...तो अवनीला वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडत होता...


एक दिवस त्याने विचारले "आई आई !!! सगळ्यांचे आजीआजोबा आहेत माझेच का नाहीत , गं...सगळ्यांचे आजी आजोबा त्यांना गोष्टी सांगतात , त्यांना फिरायला घेऊन जातात , त्यांच्या सोबत खेळतात... माझे आजी आजोबा कुठे आहेत गं ?" 


अवनी कडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं...


अजय आणि अवनी ने खुप विचारांती एक निर्णय घेतला...आजी आजोबा दत्तक घेण्याचा...ते दोघे आयुष्यात ज्या सुखपासून वंचित होते त्या सुखापासून त्यांना ऋग्वेदला वंचित ठेवायचं नव्हतं...


आणि ऋग्वेदच्या वाढदिवशी त्यांनी त्याला जगातील सर्वात अनमोल भेट दिली होती त्याचे आजी आजोबा...


एका वृद्ध जोडप्याला एक हक्काचं घर मिळालं होतं...अजय अवनीला आईबापाचं प्रेम तर ऋग्वेदला आजीआजोबाच्या मायेची ऊब...


या जगात असे अनेक अजय ,अवनी , आणि ऋग्वेद आहेत ज्यांना आई बापच प्रेम हवं आहे...आजीआजोबांची माया हवी आहे...आणि असे अनेक आजी आजोबा आहेत ज्यांना एक हक्काचं घर हवं आहे , नातवंडांचं प्रेम हवं आहे...

आधार हवा आहे...तो आधार प्रेम त्यांना मिळालं तर म्हातारपण ओझं बनणार नाही...म्हातारपण कष्टदायक राहणार नाही...आणि ते ही आनंदाने जीवन गीत गातील...


  या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


Rate this content
Log in