STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

2  

akshata alias shubhada Tirodkar

Others

दिवाळी नात्याची

दिवाळी नात्याची

2 mins
150

"अनघा अगं अजून तयार नाही झालीस कामावर नाही जायचं "

"नाही आई मी सुट्टी टाकली" 

"का गं बरं नाही वाटत "

"नाही आई मी बरी आहे मी दिवाळी साठी सुट्टी टाकली आहे "

"म्हणजे दिवाळी ला तर अजून आठ दिवस आहे "

"हो त्यासाठी तर ह्या वेळी मी पारंपरिक दिवाळी साजरी करायची ठरवलं आहे सगळं काही घरातल्या घरात बनवायचं नो रेडिमेड "

"काय "?

"हो आई तुम्ही नाही का करत होता पण मग तुम्हला जमेना से झाले मग आपण रेडिमेड वर आलो पण ह्या वर्षी मी ठरवलं कि हि दिवाळी कुछ हटके करायची आणि तुम्हला माहित आहे का तुमच्या नातवाला आकाशकंदील स्वतः हाताने बनवण्यास सांगितले आहे "

"काय म्हणजे तू मनावर घेतलंस तर पण मी तुला जास्त मदत नाही करू शकेन ""

"काही नाही तुम्ही फक्त ऑर्डर द्या मग बघा मी फराळ करते ते "

"हो चल आपण यादी बनवू "

अनघा ने बाजारात जाऊन यादी प्रमाणे सारे सामान आणले मग घरात सुरु झाला फराळाचा बस्ता चकली पासून कारंजी चा वास घर भर घुमला अनघाच्या मुलाने आकाशकंदील हि सुरेख बनवला असेच तयारी करत करत ती शुभ सकाळ उजाडली पारंपरिक रित्या अभग्यस्नान करून मंडळी देवघरात जमली अनघा ने चक्क नउवारी नेसली होती आपल्या पत्नीला आश्यर्य चकित होऊन अनघाचा नवरा अनुज पाहत होता कारण नेहमी कुर्ता मध्ये वावरानी आज चक्क नउवारीत होती पूजा करून सगळे फराळास बसले अनुज चे वडील तर आज खूप खुश होते खूप वर्षानी त्यांनी परत एकदा पारंपरिक दिवाळी ला सुरवात केली होती त्यानी फराळ खात अनघा कडे पाहून म्हण्टले "सुनबाई मानले तुम्हाला मला माझ्या पहिलीच्या दिवसाची आठवण करून दिलीस असेच आपण पारंपारिक दिवाळी साजरे करायचो आणि आज तोच अनुभव मला आला मन खूप समाधान झालं असे म्हणतात कि दिवाळी हि दिव्याची असते ते हि खरं पण दिवाळी हि नात्याची असते आता पहा ना तू सुट्टी घेऊन आराम न करता आमच्या सगळ्यसाठी पारंपरिक दिवाळी साजरी करण्याचा चंग घेतला म्हणजे आपले नाते अजून घट्ट होत गेले 

"अहो बाबा आपल्या माणसांसाठी साठी केलंय ना ""

"हो पोरी पण तुच्या कामातून तुला कुठे ग आराम करण्यासाठी वेळ मिळतो तरी पण तू हे सर्व केलंस मस्त "

"हो तरी पण पुरे झाले माझे कौतुक चला फराळ करूया "

लगेच सोहंम म्हणजे अनघाच्या मुलाने बसता बसता सहकुटुबाचा सेल्फी घेतला आणि इन्स्टावर अपलोड केला आणि तो लिहायला विसरला नाही #पारंपरिक दिवाळी नात्याची #


Rate this content
Log in