देव भेटला...
देव भेटला...


देव देवाचे मंदिर
देव आहे गाभाऱ्यात
टिपतो तो सगळं आपल्या नजरेतून ...
रांगेत उभे राहून येणाऱ्या भक्ताना तो भेटतो
VIP पासेस वाल्या भक्ताना पटकन दर्शन घडवतो ...
हार तुऱ्यानी फळानी सजतो देवाचा गाभारा .....
सोन्या चांदीचा वर चढतो मुलामा
हे सर्व हवे असते का देवाला
कि उगीच आपण मोह मोह मायात ओढतो त्याला??
काहीतरी मागून काही देण्याची डील देवाकडे वाढत चाली आहे आजकाल ....
देवाला सगळे भक्त सारखे ...
मग का होते रांगेत आणि VIP भक्तात विभागणी सारखी ....
देवाला काही नको असत फक्त खऱ्या भक्ताची वाट पाहतो ....
खरा भक्त तो च जो स्वार्थी ,कपटी , अहंकारी नसतो...
तो फक्त आपल्या शुद्ध चित्ताने देवाला नमस्कार करतो त्यालाच देव भेटतो ....