Sunita madhukar patil

Others

4.9  

Sunita madhukar patil

Others

बर्थडे गिफ्ट 🎁

बर्थडे गिफ्ट 🎁

6 mins
861


 " मला i phone हवाचं... माझ्या सर्व मित्र मैत्रिणीनं कडे खुप महागडे मोबाईल आहेत, मला ही हवा... सानवी तावातावाने तिच्या आई - बाबांशी वाद घालत होती...

    "दोन दिवसांनी सानवीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच गिफ्ट म्हणून तिला भारी मोबाईल हवा होता... 

    "अगं पण सानवी आहेकी तुझ्याकडे एक मोबाईल, गरजेपुरत incoming आणि outgoing झालं की बस!!! कशाला हवाय android ? आणि तसही तुझं बारावीचं वर्ष आहे, त्यामुळे भारी मोबाईल विसर आणि अभ्यासावर लक्ष दे.

    " हो!! करीन मी अभ्यास...पण मला मोबाईल हवाय...आणि हे काय परत सानवी !, तुला किती वेळा सांगितलंय मम्मा मला सानवी नाही सँडी म्हणायचं..." शी !! सानवी किती outdated वाटतं...सँडी!!! सँडी कसं cool आहे...सानवी तिच्या आईशी वाद घालत होती...

    "बेटा!!सँडी!! अपने शौक के घोडे को थोडी लगाम दो...जरूरते पुरी होती है शौक नही...अपनी जरूरतों पर ध्यान दो ...शौक पुरे करते करते पुरी जिंदगी बीत जायेगी "...इतका वेळ आई आणि लेकीचं चाललेलं संभाषण ऐकून बाबांनी थोड्या फिल्मी स्टाईल मध्ये लेकीला समजावण्याचा व वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला...

    डॅडा!!! तुम्ही पण... मला वाटलं होत तुम्ही तरी माझं ऐकाल...तुम्ही मम्माला समजवाल...तुम्हीही मम्मा सारखंच बोलताय...तुम्हाला कसं सांगू हा माझ्या इमेजचा सवाल आहे...यार!!! जाऊद्या तुम्हाला नाही समजणार...असं म्हणत सानवी बॅग उचलून कॉलेजला जायला निघाली...थोडी रागातच होती ती...

     सानवीच्या आई - बाबांना कळत नव्हतं कि तिला कस समजवावं...आजची पिढी ही महागडे मोबाईल, वेगवेगळे गॅजेट्स, मित्रमैत्रीणीनं मध्ये show off या सगळ्यामध्ये एवढे वाहवत चालले आहेत कि आपल्या गरजा काय आहेत हेच त्यांना समजत नाही...

     " सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो " या शिकवणीपासून आजचा तरुणवर्ग दुरावलाय...चांगलं काय वाईट काय याची जाणीवच त्यांना उरली नाही...cool !!! दिसण्यात आणि chill...!!! मारण्यातच त्यांचं आयुष्य खर्ची होत चाललंय...

     सानवीच कॉलेज घरापासून थोड्याच अंतरावर असल्यामुळे ती सायकलने कॉलेजला जायची...ती घरातून निघताना रागातच होती...तिच्या डोक्यात सारखे मोबाईलचेच विचार येत होते...मम्मा आणि डॅडा ला कसं कन्व्हेंस करायचं...मोबाईल कसा मिळवता येईल... या सगळ्या विचारात रस्त्यांनी येणाऱ्या गाडयांकडे तीच दुर्लक्ष होत होतं ...त्यांचे हॉर्न तिला ऐकू येत नव्हते...ती स्वतःच्याच तंद्रीत सायकल चालवत होती...त्यामुळे तिला समोरुन येणारी भरधाव कार दिसलीच नाही...

      बस्स!!!आत्ता काहीतरी अघटीत घडणार तेवढ्यात रस्त्याच्या कडेला भाजी विकत बसणाऱ्या एका आजीच्या आवाजाने ती भानावर आली...आणि समोर बघितले...गोंधळून तिने स्वतःला वाचवण्यासाठी सायकलची दिशा बदलली...आणि सायकल डाव्याबाजूला रस्त्यावरून खाली उतरवली...या प्रयत्नात ती सायकल वरून पडली...

      तिने उठून स्वतःला सावरलं...कपडे ठीक केले...तोपर्यंत त्या म्हाताऱ्या आजी तिच्यापर्यंत पोहचल्या आणि विचारलं..."लंय लागलं व्हय ग पोरी, अशी कशी ग तु, तुला पुढनं येणारी गाडी दिसली नाय व्हय ". त्यांनी तिला पाणी दिल रस्त्यावर यायला मदत केली...तिला जास्त दुखापत नाही झाली...थोडक्यात निभावलं होत...थोडं हाताला खरचटलं होत...आणि पायाला लागल्यामुळे थोडी लंगडत होती...

      "कुठं चालली हुतीस पोरी..."आजींनी विचारलं..."कॉलेजला..." सानवी उत्तरली..."बरं आजी मी निघते आता...आधीच उशीर झालाय कॉलेजला...आणि thank you आजी मला मदत केल्याबद्दल...सानवीने आजीचे आभार मानले आणि जायला निघाली...पण पायाला मुकामार लागल्यामुळे तिला नीट चालता येईना...

      "अंग!!! पोरी इथंच रस्त्याच्या पड्याल माझं घर हाय, तुला लय लागलंय बघ...तिथं पारभर बस जरा बरं वाटलं की जा मग कालीजात ...आन हातालाबी जरा खरचटलय, त्याला हळद-बीळद जरा लावलं मजी बर वाटलं बघ तुला...चल माझ्या घरी..."

      आजीचा तो प्रेमळ आग्रह सानवीला मोडवला नाही आणि ती आजीसोबत तिच्या घरी जायला निघाली...आजीने तीच भाजीच गाठोडं डोक्यावर घेतलं आणि सानवी हळू-हळू लंगडत तिच्या पाठी चालू लागली...थोडंसं चालल्यानंतर दहा-पंधरा घरांची वस्ती लागली...त्यातल्याच एका घराचं दार उघडून आजी आत घुसली..."अंग पोरी !!! ये की आत बाहेरच काय थांबलीयास..."आत घुसताच आजीने आवाज दिला...

     ती आत गेली...चार भिंती आणि वर पत्र्याचं छप्पर एवढंच काय ते घर होत...घराच्या एका कोपऱ्यात एक लोखंडी कॉट आणि त्यावर एक जुनं बेडशीट अंथरलं होत...तर दुसऱ्या कोपऱ्यात एक चुल मांडली होती...थोडी भांडी , कपडे एवढचं सामान होत त्या घरात...तिने घराचं निरीक्षण करेपर्यंत आजीने चुलीवर चहा ठेवला होता...घर छोटच असलं तरी व्यवस्थित, साफसूतरं होत...

     चहा बनेपर्यंत आजीने तिच्या हाताच्या जखमेवर हळद आणुन लावली होती...तिथेच एका कोपऱ्यात छोटयाशा स्टुलावर तिला काही पुस्तके ठेवलेली दिसली...

     "आजी ही पुस्तके कोणाची..."सानवीने विचारलं...आणि त्यातली काही पुस्तके घेऊन ती चाळू लागली..." सांगती बघ, पण त्या आधी मला तुझं नाव सांग बघू...काय नाव हाय तुझं..."आजीनीं विचारलं...       "सँडी!!!अं!!! नाही...सानवी नाव आहे माझं ...तिने सांगितलं..."

     तोपर्यंत आजी ने तिला चहा आणुन दिला...चहा पीत-पीत आजी सांगू लागली....

     "ती पुस्तकं माझ्या नातीची हायती...ती कालीजात शिकती...चौदावीला हाय...ते काय बीए का फीए काय म्हणत्याती त्याला...लई हुशार हाय बघ...

     लहानपणीच तिचं आई - बा गेलं...एका अपघातात...ही पोर तेवढी वाचली बघ...अन तिची सगळी जवाबदारी माझ्यावर येऊन पडली...तवापसनं आमी आज्या-नाती एकमेकींचा आधार बनलूया...

     सानवीला प्रश्न पडला फक्त भाजी विकून ह्यांचा खर्च कसा भागत असेल बरं....

     " आजी एक विचारू फक्त भाजी विकून तुमचा खर्च कसा भागतो, तुमचं वय पण झालंय तुम्ही कस एवढं सगळं करता...तीने विचारलं...

     "आजीच्या डोळ्यात पाणी आलं...ती म्हणाली "माझी नात लई गुणाची हाय बघ, कालीजातनं आल्यावर सांजच्याला साळतल्या पोरांच्या शिकवण्या घीती...त्यातनंबी दोन पैस भेटत्याती...हुतीया तेज्यावरचं गुजराण कशीतरी..."

      सानवीला जाणवलं खुप वेळ झाला आपल्याला इथे येऊन, आता निघायला हवं...चहा पिल्यामुळे थोडी तरतरी आली होती तिला...आणि थोडं बरं ही वाटत होतं...

      "आजी मी निघु आता खुप वेळ झाला"...म्हणत तिने आजीचा निरोप घेतला...जाता-जाता ती आजीच्या नातीचं नाव विचारायला मात्र विसरली नाही...ज्योती नाव होत तीचं...

      संध्याकाळी कॉलेज मधून आल्यानंतर ती थोडी शांत-शांतच होती...दुखत असल्यामुळे अजूनही ती थोडं लंगडत होती...हातावरच्या खरचटल्याच्या जखमा आणि तिला लंगडताना पाहुन मम्मा ने विचारल्यानंतर तिने कॉलेजमध्ये जाताना सायकल स्किड झाल्याचं फक्त सांगितलं...

      तिचा डॅडा ऑफिस मधून आल्यानंतर त्याच्याशी ही ती जास्त बोलली नाही....रोज चिवचिव करणारी करणारी डॅडाची चिमणी आज थोडी गप्पगप्पच होती...रात्री ही ती जास्त काही न बोलताच झोपी गेली...

      दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मम्मा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती शांतच होती...तिच्या डॅडाने ही तिला काय झालं...मोबाईल साठी रुसली आहेस का?...आणखी दुसरा काही त्रास आहे का...असे अनेक प्रश्न विचारून तिला बोलतं करायला बघितलं...पण ती जास्त काही बोललीच नाही...बहुतेक ती पडल्यामुळे तिला दुखत असेल...असा अंदाज त्या दोघांनी लावला...

      तिचं अस शांत राहणं तिच्या वडिलांना खटकत होत...म्हणुन नाईलाजास्तव त्यांनी तिला मोबाइल गिफ्ट घ्यायचं ठरवलं...ही आजकालची मुलं पण ना आपल्या आई वडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्याला हवं ते करवून घेतातच...

      दुसऱ्या दिवशी सकाळी सानवीचे आई-बाबा गिफ्ट घेऊन तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या रुममध्ये गेले...बघतात तर ती तिथे नव्हती...तिला सगळीकडे शोधले पण ती कुठेच नव्हती...रोज उशिरापर्यंत झोपणारी ही आज एवढ्या लवकर उठुन गेली तरी कुठे? त्यानां काहीच समजतं नव्हतं...सगळीकडे शोधाशोध केली पण तिचा पत्ताच नाही...आता ते दोघे ही खूप टेन्शन मध्ये आले...खुप घाबरले...काय करावं काही कळतं नव्हतं...तिला शोधण्या साठी बाहेर निघणार इतक्यात ती गेटमधून आत येताना दिसली...

      "अंग कुठे होतीस तु...काय चाललंय तुझं, अस न सांगता कुठे गेली होतीस...आम्हाला किती टेन्शन आलं होत माहिती आहे का तुला?...जीव जायचा बाकी होता..." तिची आई तिला ओरडत होती...

      हो हो!!!मम्मा सांगते सगळं...प्लीज!!आधी तुम्ही दोघे माझ्यासोबत चला...कुठे? काय? सगळं सांगते...सानवी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती...

     अंग पण कुठे ? डॅडानी विचारले...

     आज माझा बर्थडे आहे ना...तोच सेलिब्रेट करायला जायचं आहे...प्लीज!!!आता आणखी प्रश्न नका ना विचारू...प्लीज!!! 

     ठीक आहे चल म्हणून दोघे तिच्या सोबत जायला निघाले...तिच्याकडे बर्थडे केक सोबत अजून ही बरच समान होत...तीने गाडी एका घरासमोर थांबवायला सांगितली...ते घर परवा भेटलेल्या भाजी विकणाऱ्या म्हातारीच होत...तिने बाहेरूनच आजीला आवाज दिला...आजी पण तिला एवढ्या सकाळी बघून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली..."आग पोरी एवढ्या सकाळी इकडं कुठं?...अन कशी हायस तु...बरी हायस नव्ह..."

     "हो आजी मी बरी आहे...ज्योती आहे का घरी...आज तिचा वाढदिवस आहे ना...तोच साजरा करायला आले आहे मी...आणि हे माझे आई- बाबा...तिने आजी आणि आईबाबांची ओळख करून दिली...तिच्या आईबाबांना काहीच कळत नव्हतं नक्की इथे चाललंय काय? त्यांनी तिला आजीबाबत विचारलं...तिने परवा घडलेली सर्व हकीकत आईबाबांना सांगितली...त्यांना ऐकून धक्काच बसला , एवढं सगळं घडलं आणि हीने आपल्याला काहीच सांगितलं नाही म्हणून तिचा राग ही येत होता...आणि आता ती जे काही करत होती त्याच कौतुक ही वाटत होत...

     ज्योती घरीच होती, पण तिच्या वाढदिवसाबद्दल सानवीला कस समजलं हा एक प्रश्नच होता...

     "अंग पण पोरी माझ्या ज्योतीचा वाढदिवस आज हाय हे तुला कसं कळलं "…आजीने विचारलं..."अहो !!! आजी मी परवा नाही का ज्योतीची पुस्तकं बघत होती ...त्यात तीचा शाळा सोडलेल्या दाखल्याची झेरॉक्स होती...ती मी बघितली...त्यात तिची जन्मतारीख होती...सानवीने सांगितले...

     तिच्या आईबाबांना ही तिचं आज खुप कौतुक वाटत होत...परवा मोबाईलसाठी कचाकचा भांडणार त्यांचं पिल्लू एवढं समंजस कधी झालं!!!...ते कौतुकानी तिच्याकडे बघत होते...

     ज्योती आणि सानवी दोघींनी मिळून केक कापला...मस्त गप्पा मारल्या...दोघींची छान गट्टी जमली होती...सानवीे येताना ज्योतीच्या ट्युशनच्या मुलांसाठी वह्या, पुस्तके, शाळेत लागणारी स्टेशनरी घेऊन आली होती...

     सानवीचे आईबाबा आज भरून पावले होते...त्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान दिसत होत...त्यांनी जी संस्काराची शिदोरी तिच्यासाठी बांधली होती ती तिला जन्मभर पुरणारी होती...भविष्यात ती कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही याची खात्री त्यांना पटली होती...

     तिला ही आईबाबा काय समजावण्याचा प्रयत्न करत होते हे तिला समजलं होत...

     आज तिच्याही चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता...

     तिला नवीन जगण्याची कला गवसली होती.. 


Rate this content
Log in