Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

vaishali vartak

Others


1  

vaishali vartak

Others


बदल

बदल

3 mins 412 3 mins 412

ऑफिस संपवून मीरा व मंजू घरी निघाल्या. बस स्थानकाला आल्या, पाहतात तर काय! बस स्थानकाच्या

समोरच्या दुकानात बायकांची ही गर्दी! सर्व बायका गर्दी करून होत्या. काही जणींनी भल्या मोठ्या पिशव्यातून जुने सामान कोंबून आणलेले व काही जणी नवीन वस्तूंचे बॉक्स घेऊन जाताना दिसत होत्या. हा काय प्रकार आहे? तर मंजुचे लक्ष दुकानाच्या वर नवीन लावलेल्या फलकाकडे गेले.


’त्वरा करा. घरात बदल घडवा, बदल करा. जुन्या कोणत्याही वस्तू देऊन नवीन खरेदी करा!’


खरंच "बदल" ही जीवनात हवीहवीशी वाटणारी बाब आहे ना! त्यातून सध्याच्या प्रगतीशील वैज्ञानिक काळात तर, चालू जीवनशैलीशी एकरूप होऊन चालावयाचे तर "बदल" हा प्रत्येकाला प्रत्येक थरात करावयास हवाच.


केशवसुतांच्या कवितेनुसार ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ त्याप्रमाणे जुने सोडून नवीनतेकडे कल वाढविण्याचा "बदल" केला पाहिजे. जुन्या वस्तूंना कुरवाळीत बसण्यापेक्षा बदलत्या आधुनिक, अद्यतन वस्तूंचे अंगीकरण केले पाहिजे. कारण जुन्या वस्तू काळाप्रमाणे तितक्या प्रमाणात

सेवा देऊ शकत नसतात.


असे असता त्यांचा मोह दूर करून नवीनीकरण करण्याचा बदल केला पाहिजे. तेव्हा दुकानात बायकांची गर्दी होती ती रास्तच होती. कोणी जुनी भांडी, कपडे, घड्याळे तर टेप-रेकॉर्डर वगैरे देऊन अद्ययावत वस्तू घेवून जात होत्या.


तेव्हा ''बदल" हा जीवनात महत्वाचा हिस्सा आहे. अहो, ही पृथ्वी जिच्या पंचतत्वातून आपले शरीर बनले आहे. तिच्यातच पाहा ना रोजच्या रोज बदल घडत असतो. निसर्ग सृष्टी तर रोजची रोज बदललेली असते.


रोज रात्री आकाशात उगवणारा चंद्र, रोजच कलेकलेने मोठा व लहान होत असतो व त्याच्या कलेप्रमाणे सागरास भारती ओहोटी येत असते. म्हणजे सृष्टीत पण नवे नित्य बदल घडत असतात. सूर्याच्या भ्रमणाने ऋतू बदलतात. सर्व सृष्टी बदलते. जसे वसंतात नवी पालवी, वर्षात सर्व सृष्टी हिरवेगार वस्त्र

परिधान केलेली, तर ग्रीष्मात पिवळी झालेली, तर शिशिरात पानगळी. तेव्हा आपल्या अवनीत पण असा बदल घडत असतो आणि त्या बदलामुळेच आपणास ऋतूंचा आनंद लुटता येतो.

   

इतकेच काय, आपल्या जीवनचक्रात पण बाल्य, तारुण्य, प्रौढ व वार्धक्य असे बदल घडत असतात व त्या त्या काळाप्रमाणे आपल्या वागण्यात, बोलण्यात, पोषाखात, इतकेच नव्हे  तर स्वभावात बदल घडतो व हा बदल करावा लागतो आणि तसा "बदल" केला तरच आयुष्य जगणे सुसह्य होते व त्या बदलामुळेच वागण्यात ''वाऱ्याप्रमाणे पाठ फिरवावी” अथवा परिस्थितीवरून "अंथरूण पाहून पाय पसरावे" व वेळेनुसार ''when we are in Roam we must be roaman" अशा "बदल" या गुणर्धमावरून त्या स्वरूपाच्या म्हणी प्रचलित झाल्या आहेत.

  

सध्या "उंच माझा झोका" या रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित मालिकेतून

काळात झालेला बदल आपण पाहतोच. त्या काळातील स्त्री जीवन व आत्ताचे स्त्री जीवन यात जमीन अस्मानाचा काळाचा झालेला बदल आहे. हा काळाप्रमाणे घडलेला सामाजिक बदल आहे. त्या काळात समाजसुधारकांना असा बदल घडविताना कितीतरी त्रास सहन करावा लागला. त्या काळाच्या लोकांकडून होणारी स्त्रियांची कुचंबणा, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांच्या जीवनाकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन यात बदल 

घडविण्याचे काम समाजसुधारकांना करावे लागले. त्या केलेल्या व समाजाने घडविलेल्या बदलामुळे आजचे स्वतंत्र विचारसरणी तसेच सुशिक्षित स्त्रीयांचे जीवन दिसत आहे.

  

तसेच प्रौढ पिढीने पण तरुण पिढीकडे काळाप्रमाणे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि आता तर जागतिकीकरण झाले आहे व विज्ञानाच्या प्रगतीने जगच जवळ आले आहे. आपल्या आहारात, पोषाखात बदल झालेले आहेत व त्या बदलाचे नुसते आगमन नव्हे तर स्वागत पण झालेले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या सण, उत्सवात जसे पोळा, वट पौर्णिमा, नागपंचमी, ऋषीपंचमी, दिव्याची अमावस्या हे सण त्या त्या दिवशी पशु, वनस्पती, वस्तू वगैरेंच्या उपकाराची, त्यांच्या ऋणाची आठवण म्हणून साजरे करतो, त्याचबरोबर mother's day, father's day, friendship day ,valentine day वगैरे पाश्चात्य पद्धतीचे दिवस पण कमी अधिक प्रमाणात साजरे होणे हा काळाप्रमाणे झालेला बदल आहे.

    

पर्यावरणाचा विचार करता प्रदूषण थांबविण्यासाठी, कायमस्वरूपी गणेशाची मूर्ती अथवा फक्त शाडूच्या मातीच्या बनविलेल्या  गणेशाच्या मूर्तींची स्थापना करावयास हवी. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित होत नाहीत व श्री गणेशाचे छिन्न विछीन्न रुप पाहावयास मिळते व मुर्ती बनविताना वापरण्यात येणाऱ्या रंगानी जलाशयाचे  पाणी पण प्रदूषित होते व जलचर प्राण्याची हानी होते. तेव्हा सोसायटीच्या बाहेर ठेवण्यात येण्याऱ्या मोठ्या पिंपातून, हौदातून गणेशाचे विसर्जन करणे हा बदल पण आवश्यकच आहे.

  

तसेच साहित्यात, नाट्य कलेत पण बराच बदल झाला आहे. काव्यात पण यमक, छंद, वृत्त या बरोबर   मुक्तछंदात काव्य रचना प्रचलित झाल्या आहेत. तसेच वेळेअभावी संगीत नाटके जाऊन आता  आधुनिक प्रकारची नाटके व त्या नाटकातून अभिनयाबरोबर अंगविक्षेपाला पण जास्त महत्व देवून मनोरंजन करण्याकडे  झालेला नाट्य रंग भूमीतील बदल आहे.


तेव्हा थोडक्यात काय, बदल हा जीवनात सर्व थरातून घडत असतो व तो आनंद देणारा व आवश्यकच असतो.


Rate this content
Log in