The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बालपण...

बालपण...

1 min
563


फक्त हसणं काय ते जीवाला माहित होतं 

रडवायला तर आता लागलंय बघा जमायला 


पडलो तरीही सावरायला स्वतःच शिकलो 

आता पडण्याआधीच अडखळत असतो 


दुःखाचं सावट डिवचण्याआधीच दडायचो 

आता दुःखाच्या छायेत निवांत विसावतो 


बोलणं तेव्हा कसं बिनधास्त वाटायचं 

आता बोलणंही पैशापेक्षा महागलंय 


पाणावलेले डोळे असंख्य प्रश्न करायचे 

आता प्रश्नांचे प्रश्नावरच रडके प्रश्नचिन्ह 


हळवं प्रेम तेव्हा निष्पक्ष निष्पाप असायचं 

आता स्वार्थाचं गालबोट चिकटूनही दुरावलेलं 


बालपणीच्या व्याख्यांना संतुष्ट करणं माहिती 

समाधानाची व्याख्या आता शोधून सापडत नाही 


निखळता झराच जणू होता बालपणीचा 

आता एक थेंबही जणू चाखायला नाही 


मोत्यासारखं सुरेख होतं तेव्हा हस्ताक्षर 

आता डिजिटल किमयाचं ग्रहण लटकलेलं 


तेव्हा अनेक घिरट्या असायच्या एका चुकेमागे 

आता चूक कळूनही माफीनामा फेरा घालत नाही 


तेव्हाच्या रम्य जगण्याला अनेक भेटतील साक्षीदार 

आता मात्र जगणं नेमकं काय विसरला मूर्तिकार 


तरीही बालपणीच्या आठवणी आठवत जगूयात 

मोठेपणाला नव्याने बालपण शिकवत राहूयात 


Rate this content
Log in