vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

बाबा माझे दैवत

बाबा माझे दैवत

2 mins
141


अहो वहीनी ," नाना आहेत का ?आई  " हो आहेत , आताच आले आहेत"आमच्या घरी दिवे गेले आहेत हो. जरा येतील का आमच्याकडे? मला काहीच कळत नाहीत्यात(आतून बाबांचा आवाज येतो. )आलोच मी ह. आलोच... व्हा तुम्ही पुढे . (आलेले शेजारी घरी जातात. मनात समाधान की हाश ...नाना आलेले होते .बर आहे काम आपले होईल )  आई..,"अहो , जरा बाहेरून आलात चहा तरी घेऊन जा. "  पण ते ऐकले तर बाबा कसले .ज्यांच्या मनात सेवा भावी वृत्ती ठासून भरलेली "अग हा गेलो आणि आलो च. तुझ्या बरोबर चहा घेण्यास ."आग सध्यांकाळ होईल अंधारात बसावे लागेल. लहान मुले घरात मी जाऊन येतोच. असे होते .... आमचे बाबा ..कोणाला ही मदत करण्यास सदैव तयार . सामान्य परिस्थितीत रहाणारे. पेशवे कालीन मंदीर, त्याच्या आवारात छोटी छोटी.घरे होती. सर्व रहेवासींची साधी सरळ रहाणी.

 समाजाचा गणपती उत्सव वा दत्त जयंती नंतरची पालखी ..बाबा पालखी घेउन चालण्यास हजर.. कधीही हसत मुख... दुर्मुखलेला चेहरा नाही .पैशानी फार श्रीमंत वा स्वतःचे घरदार असे काहीच नव्हते. पण समाधानी कोणाला म्हणतात तर त्यांच्याकडे पहावे.   अमरावती सोडून आत्याने भाच्याला इकडे ये..कापड गिरणीत नोकरी मिळेल.म्हणून अहमदाबाद ला बोलवून घेतले. आधी आत्याकडे राहिले एकटे असता... मग लहान भाड्याच्या घरात राहू लागले. स्वतः , लहान बहीण , आई व पत्नी सह संसार सुरु केला. परिस्थिती ठीक ठीक. बहिणीचे पण त्या काळात फाईनल पर्यत शिक्षण केले. ते पण आईच्या (बायकोच्या) सागण्यानेच .     महेनती वृत्ती .तसेच स्वाभिमानी स्वभाव.. पडेल ते काम करण्याची तयारी असायची. त्यांच्या या स्वभावाने त्यांनी घराचा संसाराचा छान उत्कर्ष साधला. आईस पण माहेरची कधी आठवण येऊ दिली नाही .तिची शिक्षणाची हौस पूरी केली त्याचा बरोबर तिचा हातभार पण संसारास लागला.  रोज सकाळी तिच्या बरोबर उठून कोळशाची शेगडी पेटवून देणे ,.भाजी चिरणे . आणि ....मुखाने श्रीरामाचा जप. अशी त्यांची सकाळ व्हायची. पोळी भाजी कोशिंबीर चा डबा घेऊन सकाळी 7 ला कापड गिरणीसाठी रवाना व्हायचे. आईची पणशाळाअसायची .त्यामुळे तिला मदत करत अशी एकमेकांना साथ असायची.     स्वभावात खेळाची आवड , मनाने संघिष्ट विचार सरणी,होईल तितकी सर्वांना मदतरूप होण्याची वृत्ती .  कुठलाही समाजाचा कार्यक्रम असता बाबांची सर्व जण सातत्याने आठवण करत. कोणास अडी अडजणीस धावून जाणे अंगी मुरलेले. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो वा मैदानी खेळ असोत बाबांचा सहभाग व संचलन असणारच.  अहो ! खेळाची आवड तर होतीच . स्वतः अमरावतीस हनुमान व्यायाम शाळेचे उत्तम मलखांब करणारे .तसेच उत्तम खो -खो , कबड्डीचे खेळाडू. ह्याच खेळाडू वृत्ती ने मला पोहण्यासारख्या खेळात ... त्या काळात पण .पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास व देशभर जाण्यास मुभा दिली.   खरच आज मी जी काय फुशारकी करतेय त्याचे सर्व श्रेय त्या निष्ठावंत बाबांचे आहे. जेव्हा माझे शाळा काॕलेज तसेच राष्ट्रीय स्पर्धेत पेपरात फोटो यायचे, तेव्हा त्यांच्या मुखावरील आनंद अजून मी विसरले नाही. आता अलीकडे मी पुन्हा तरण स्पर्धेत भाग घेतेय, तेव्हा त्यांनाच वंदन करून स्मरण करते. व त्याची उणीव मनास जाणवते. आता ते असते तर काय खुष झाले असते.   बाबा जेव्हा गेले तेव्हा रहात्या विभागाचा सारा जन समुदाय हळहळला.बाबा म्हणजे सेवा मूर्ती .. आता असे धावत येऊन मदत करणारे..सर्वांच्यात खेळाची आवड निर्माण करणारे . सेवाभावी लोक मिळणे कठीण. सेवा भावी वृत्ती चे उदाहरण .शेजारच्या काकू वारल्या .त्यांना काहीतरी चामडीचा विचित्र रोग झाला होता. मृतदेहास हात लावण्यास कोणी धजत नव्हते. त्या वेळी प्रामुख्याने सर्वांना बाबांची आठवण झाली आता जर ते असते तर न कुरबूर वा न मागे पुढे पहाता अंत्यविधीला पुढे आले असते. असे अनेक प्रसंग होते जीवनात.असे सेवाभावी वृत्ती चे..मदतीला धावून येणारे ..जसे कुटुंबाचा आधार व तसेच समाजात पण प्रिय . माझे तर ते दैवत होते माझे बाबा...


Rate this content
Log in