Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

असंच असतं भावनांचं...

असंच असतं भावनांचं...

1 min
765


सहनशक्तीलाही कधी झुकवावी लागते मान

कुणाच्या निर्धारापुढे तर कुणाच्या जिद्दीपुढे


द्वेष, तिरस्कार अशा शब्दांचे घाव न भरणारे

जखम दिसत नसली तरीही मन पोखरणारे


डोळ्यात पाणी नसले तरीही रडवणारे

रंगात भावनांच्या विव्हळत सोडून देणारे 


नमते घेणे म्हणजे हार नसतेच नेहमी

इतरांना खुश ठेवण्याचा असतो एक प्रयत्न


तरीही नेहमीच नसते गप्प राहता येत

कधी होतो उद्रेक या गुण-अवगुणांचा 


असंच असतं भावनांचं मोडकंतोडकं गणित 

तेही व्यक्त होण्याचं साधनच असतं शेवटी.....!


Rate this content
Log in