अपराध अश्रुंचे...?
अपराध अश्रुंचे...?
1 min
458
जर आपल्या चेहऱ्यावरचे
न दिसणारे दुःख
नि डोळ्यातंच सुकून गेलेले अश्रू
कळाले असते कुणाला
तर अपराधी नसलेलं आपलं मन
मोकळं करता आलं असतं थोडं.....
स्वकीयांनी दिलेलं दुःख
लपवणं जमतं म्हणा आता.....
इथे दोन्हीही बाजूने
आपणंच तर असतो अपराधी...
पण तरीही जर समजून घेणारं
खरंच असतं कुणी.....!
