अपमान माझा होतो
अपमान माझा होतो


शब्द आहेत खूप धारदार
त्यात गवसतो सच्चा माणूस
कदर व्हावी त्यांची योग्यचं
अन्यथा अपमान माझा होतो
विश्वासाचं देणं त्यात लाभतं
ताकद त्यांची अधिक
पुरेपूर मिळावा प्रतिसाद
अन्यथा अपमान माझा होतो
शब्द वापरावीत सबुरीने
सुखावतात मनाला गोडव्याने
जरी लाख असतील अपशब्द
अन्यथा अपमान माझा होतो
लेखणीचा शब्द संसार
वाचकांची माया प्रतिसाद
नको द्वेष मिटवण्याचा
अन्यथा अपमान माझा होतो
शब्द समाधान मनाच्या शांतीचे
जीव कि प्राण माझ्या काळजाचे
देतात मान नाही पोहचवत ठेच
अन्यथा अपमान माझा होतो