अंती मात्र जगणं शिकवलं....
अंती मात्र जगणं शिकवलं....


वेड्या ध्येयाच्या पंखांना बळ देणं
अपयशाच्या पायऱ्यांनी शिकवलं
हतबलतेच्या कठोर परीक्षांमुळे
स्वतःला खरं ओळखणं झालं
स्वप्नांना उत्तुंग अवकाश गाठणं
प्रेरणा देणाऱ्यांनी निस्वार्थ शिकवलं
सतत मागे खेचणाऱ्या अहितांमुळे
स्वतःच्या क्षमता आजमावणं झालं
प्रबळ नि ठाम विश्वास बाळगणं
विश्वासघाती विचारांनी शिकवलं
वेळोवेळच्या अशा अविश्वासामुळे
स्वतःला एक नामी संधी देणं झालं
निर्णयांना दीर्घकालीन दूरदृष्टी देणं
आक्रमक विचारसरणीने शिकवलं
दिशाभूल करणाऱ्यांच्या वणव्याने
स्वतःचं आत्मनिर्भर होणं झालं
कुणी हसवलं तर कुणी रडवलं
अंती मात्र स्वतःसाठी जगणं शिकवलं
निराश झालेल्या दयाळू मनाला
स्वतःच सहज असं समजणं झालं