STORYMIRROR

Dr Shiva Aithal

Children Stories Inspirational Others

3  

Dr Shiva Aithal

Children Stories Inspirational Others

अनाथांच्या नाथा तुज नमो

अनाथांच्या नाथा तुज नमो

3 mins
160

माझ्या मुलीसोबत, सेवालय लातूर इथल्या एचआयव्ही बाधित अनाथ मुलांनी बनवलेल्या शाडूच्या गणपती घ्यायला, मी डॉ. पवन चांडक यांचे क्लिनिकमध्ये गेलो तेव्हा डॉ. आशा पवन चांडक म्हणाल्या "सर बहोत सुंदर फिनिशिंग, शायद बच्चों से न जमा हो, मगर मूर्तियां शाडू की है! बाजार में अगर आप जाएंगे तो शाडूके गणपती (इको फ्रेंडली) है ही नहीं". तेवढ्यात डॉ. पवन चांडक यांच्या ओळखीचे एक व्यक्ती आपल्या मुलां सोबत आले आणि चिमुकल्या मुलाला सांगितलं की एखादा गणपती पसंत कर. छोट्या मुलाला एकही गणपती पसंत आला नाही आणि त्याने बाबाला बाजारात दुसऱ्या सुंदर मुर्त्या आहेत त्यांच्या मधूनच घेऊ असे बजावले. मुलं निरागस असतात त्यांच्या आपल्या पसंती असतात, पालकांना हे कळते. तो पालकही समजदार होता, त्याने खिशातून काही पैस काढले गणपती न घेता सेवालय इथलल्या मुलांच्या आहारासाठी निधी म्हणून देऊन, रीतसर त्याची पावती घेउन गेला. डॉ. आशा चांडक, जे तिथे मन लावून लोकांना गणपती दाखवित होत्या, व एक-एक गणपतीच्या उत्पत्तीची कहाण्या सांगत होत्या, त्या म्हणाल्या कि, बरेच लोकांना मूर्त्या पसंत न आल्यामुळे तसेच परत गेले.एक सहज विचार माझ्या मनात येऊन गेला की, आपली मुलं छोटी असताना, ती सरळ वाकडे रेषे ओढुन काहितरी चित्र काढतात, काहीतरीच खरडतात, मग आपण त्या मधे आपली बुद्धि लावून एखादा चित्र शोधतो आणि आपल्या मुलाचा कौतुक करून थकत नाही. मग सेवालयच्या मुलांनी बनवलेल्या एवढ्या सुंदर मूर्त्यां मध्ये, सरळ सरळ देव न दिसता, कोणाला काय दोष दिसू शकते हे मला अजून समजले नाही. 

ही निरागस मुले जेव्हा छोटी होती आणि परभणीच्या एका अनाथाश्रम मध्ये दम कोंडून राहत होती, तेव्हा अशाच एका दुर्दैवी सायंकाळी एका निरागस मुलाच्या अकालीन मृत्यूनंतर डॉ. पवन यांनाही सुचत नव्हतं कि ह्या देहाला पुरावं की जाळावं. या निरागस मुलां एवढीच निरागसता मी डॉक्टर पवन यांच्यात, मागच्या पाच वर्षांपासून त्यांच्या कामाच्या व सायकलिंगच्या सहवासात, बघितलेले आहे. निर्णय घ्याव्या लागतात व घेतल्या गेल्या. नंतर त्या अनाथाश्रम विरुद्ध सडेतोड लढाई एकट्या डॉ. पवननी स्वत: घेतली व कायदेशीररीत्या परभणीतील सर्व अनाथ मुलांना लातूर सेवालय इथे रवी बापटले सर यांच्या पालकत्वात सोपवुन दिले. डॉ पवन, त्यांचे वडील सत्यनारायणजी चांडक, त्यांची आई, त्यांची अर्धांगी डॉ आशा पवन चांडक, ह्या कुटुंबीयांच्या मनात अजुन कार्य संपले नव्हते पण सुरू झाले होते, ते म्हणजे या मुलांचे पुनर्वसन. तन मन धन झोकून ह्या कुटुंबांनी या मुलांसाठी नभ-धरती एक केले. झरीचे कांतराव देशमुख काका यांचेही खूप मोठे योगदान व सहकार्य आशीर्वाद रूपी ह्या कार्यास लाभले. स्वावलंबनाच्या मार्गावर जगत असताना, मग वर्षातून जसे जमेल तसे, ही मुलं आंबे उगवतात, राखी बनवतात, जुन्या साड्यांच्या पिशव्या तयार करत व आपले जीवन निर्वाहाची सोय, खरी कमाई द्वारे, भिक नको हवे घामाचे दाम म्हणून धडपडत राहतात . फूल नाही फुलाची पाकळी म्हणून डॉक्टर पवन चांडक यांचे कुटुंब त्यांच्या मदतीला धावून जातात.

मातीतच जर देव असला असता तर मुलांच्या हातातून हा उत्पन्न झालाच नसता. आपल्या मानवी समाजाला जर हा मातीचा "नॉट सो परफेक्ट" गणपतीच सुंदर दिसणार नाही तर, ह्या बाप्पाला घडवणारी "इवन मोर नॉट सो परफेक्ट" ही मुलं केंव्हा सुंदर दिसणार ~ हे हा बाप्पाच जाणो. "नॉट सो परफेक्ट" असलेला गणपती हाच संदेश देतोय कि माझ्या माध्यमातून तरी त्या मुलांचे क्रॉनीकली डिटोरियेटिंग इम्परफेक्ट हेल्थ कंडिशन कडे बघा व त्यांच्या मेहनतीला व जगण्याच्या धडपडीला योग्य ती किंमत देऊन मला तरी घरी न्या. माझ्या मुलीला छोट्या गणपती खूप आवडतात, ती म्हणाली, "पप्पा सर्वात मोठ्या दोन गणपतींचे पैशे देऊन आपण सर्वात छोट्या दोन गणपती घेउन जाऊ", नंतर तिने मन बदलले ती म्हणाली, "पप्पा जे कुणीच घेऊन जात नाही ते गणपती आपण घेऊन जाऊ". मागच्या पाच वर्षांपासून, तीही सेवालयाच्या मुलां सोबत मानसिकरित्या जोडले गेलेली आहेच. 


Rate this content
Log in