कुणीही करू शकतो ~ पी.एच.डी. !
कुणीही करू शकतो ~ पी.एच.डी. !
लुईस पाश्चर, एंटोनी-वॉन-ल्यूवेन्हॉक, आर्किमिडीज, सॉक्रेटिस आणि अश्या सर्व मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांची मला नेहमीच, विशेष नवल व कमाल हे वाटत आली आहे की, हे सर्व ‘एक’ सिद्धांत घेऊन जगले व त्या सिद्धांताच्या शेवटच्या टोकापर्यंत आपले विचार नेले. इतकेच नव्हे तर या सिद्धांत व अध्यात्माचा जनहितासाठी निरंतर पुढच्या काळात उपयोग झाला. त्यांच्या विचारसरणीतून जे जे विषय उत्पन्न झाली, त्या विषयाचे ते मूळत: तज्ञ नव्हतेच. उदाहरणार्थ डी.एन.एचा शोध लावणारे वॅटसन अँड क्रिक, (वॉटसन हे भौतिकशास्त्र विषयाचे व क्रीक जीवरसायन शास्त्राचे) ते ज्या मुळ विष्याचे होते त्यात शोध लावलेच नाही. पण मूळ विषयांच्या मदतीने दुसरेच काहीतरी शोध लावले व त्यांने जन कल्याण झाले. सुक्ष्मदर्शकाचे जनक एंटोनी-वॉन-ल्यूवेन्हॉक तर एक कपड्याचा व्यापारी होता. कपड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी व आता मधल्या फॅब्रिक नेटवर्क बघण्यासाठी त्याने स्वतः काच घोटून, काही त्याकाळात अस्तीत्वात असलेल्या भिंगांपेक्षा, जास्त जाडीचे भिंग बनवले. त्या भिंग बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये तो इतका गुंतला कि त्यांने त्यातले उच्चतम अध्यात्म गाठले व पुढे सूक्ष्मदर्शक निर्माण केले. लोकांनी त्याला सूक्ष्मदर्शक व सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक मानले. लुईस पास्चर ने जे लसी निर्माण केले, त्यावर लोकांचा विश्वास नव्हता, म्हणून त्याने त्या लसी स्वत: घेऊन लोकांच्या कसोटीचे प्रमाण दिले. आज पास्चरच्या लसीचे महत्त्व वेगळे काय सांगायचे. हे सर्व ‘कामगार’ पी.एच.डी. धारक नव्हते व त्यांनी कोणत्याच विद्यापीठातून कोणतीही डिग्री उपलब्ध करून घेतली नव्हती. पण अध्यात्माचा म्हणजे फिलॉसॉफी चा उच्चतम गाठून हे लोक त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या विचारांचे विद्यावाचस्पती झाले होते.
बहुधा याच कारणासाठी विज्ञान असो, की कला असो, कि वाणिज्य असो, शेवटी, एम.ए., एम.कॉम., एम.ए.सी., नंतर एकच अध्यात्मिक डिग्री असते, ते म्हणजे पि.एच.डी. अर्थात डॉक्टरेट इन फिलॉसॉफी. कोणत्याही शाखेतून पोस्ट-ग्रॅजुऐट झाल्यानंतर बहुदा या सर्व पी.एच.डी न झालेल्या पण जनहितासाठी अध्यात्माचा उच्चांक गाठलेल्या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थच शेवटची डिग्री म्हणजेच पी.एच.डी. ठेवलेली असावी. पी.एच.डी. कोणीही होऊ शकतो, तुम्ही सुद्धा. फ्कत आपल्यामध्ये एक "फिलॉसॉफी" म्हणजे आपले विचारांचे अध्यात्म व त्यातले उच्चतम गाठण्याची एक सवय पाहिजे. बघा जसे, सामान्य माणसांच्या पी.एच.डी.ची काही उदाहरणे.
उदा: १ मला ज्यांनी कार ड्रायव्हिंग शिकवलं ते आहेत शर्माजी (प्रेमाने लोक त्यांना ‘बंड्या’ म्हणतात), ड्रायव्हिंग मध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं, आत्तापर्यंत ट्रेन, विमान व समुद्री जहाज सोडले तर रोडवर चालणारे प्रत्येक वाहन, लाखो किलोमीटर त्यांनी चालवली आहे. हे करत अस्तांना त्यांचे स्वत:चे काही नियम व सेफ्टी ट्रिक्स ते असे शिकवतात कि डोक्यात ती गोष्ट कायम बसून जाते. झाली त्यांची पी.एच.डी व झाले ते ड्रायव्हिंगचे गाईड.
उदा:२ माझ्या हॉटेलमध्ये दहा वर्षांपूर्वी बंगालचा एक माणूस आला व त्यांनी रसगुल्ले बनवले. हल्दीराम असो वा दुसरा कोणी कलाकार असो, सहसा एका किलोमध्ये फक्त वीस ते बावीस रसगुल्ले तो बनवु शकतो. हा बंगाली कलाकार ३५ रसगुल्ले काढायचा, हे कसे बनवायचे विचारलं तर, तुम्हीच बघा म्हणायचा व सर्व प्रक्रिया बघू देत होता पण त्याची कला दुसऱ्या कोणालाच जमले नाही. अशी लोक एका जागी टिकतही नाहीत, त्यांचे ‘आयुष्याच्या प्रयोगशाळेत नवीन रिसर्च’ सुरूच असतात. भले तो "रिक्गनाईस्ड गाइड" होऊ शकला,त्यांनी दुसऱ्याला शिकवलेच नाही किंवा असे म्हणा की बघणारे शिकू शकले नाही, नाही पण रसगुल्ला बनवण्यात तो पी.एच.डी नक्कीच होता.
उदा: ३ माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात, चाळीस ते पन्नास वर्ष कलाविधीचा, हॉटेल व्यवसाय केला. ते स्वत: एक चांगले कूक होतेच व लोकांची रुची पुर्णपने ओळखायचे, परंतु लोकांच्या भावनांची पण त्यांना सुरेख जाणीव होती. माझ्या किशोर वयात ते माझे सर्वात चांगले मित्र होते. होटेलच्या काऊंटरवर मी जेव्हा त्यांच्यासोबत असायचो, गम्मत म्हणून, आलेल्या ग्राहकांचा चेहरा बघून ते सांगायचे की ते काय ऑर्डर करणार आहेत आणि नव्वद ते शंभर टक्के तसंच व्हायचं. मला बाबांच्या ह्या कलेची खूप नवल वाटायची, मला शिकवा ना म्हणायचो, बाबा म्हणायचे, अरे! खूप सोप्पं आहे, फक्त अभ्यास कर. माझी पी.एच.डी.झाल्यानंतर मला कळाले की माझे वडील केव्हाचेच त्यांच्या क्षेत्रातले पी.एच.डी. होल्डर होते. त्यांची तीच कला मला आता विध्यार्थी ओळखायला आली आहे. हो, फक्त अभ्यास लागतो.
उद: 'n': सचिनचा अप्पर कट असो का धोनीचा हेलिकॉप्टर शॉट असो का अमिताभचा डावा हात कम्बरड्यावर ठेवून उजवा बोट गगन दिशेने केलेला डान्स असो का ए.आर. रेहमानचा हळुने झिरपणारा संगीत असो का अविश्वसनीय रित्या मागे जाणारा मायकल जॅक्सन असो का बोटांवर फुटबॉल फिरवणारा रोनाल्डो असो का बालकांनीत पेपर फेकणारा तो सैकलसवार पेपरवाला असो का दूध काढणारा दूधवाला असो का नआल्याने आपला जीव घेणारी ती कामवाली असो का तो वर्षांनुवर्षे सकाळी मुलांना शाळेमध्ये नेणारा ऑटोवाला असो का अमृततुल्य जेवण करून खाऊ घालणारी तुमची आई असो, उधाहरण ‘n’ असू शकतात.
तर माझं म्हणणं अस आहे पी.एच.डी करण्यासाठी कोणतेही विद्यापीठ अथवा लॅबरोटरी लागत नाही. अपण जर एका विशिष्ट क्षेत्रात किमान २०-२५ वर्षे काम करत आलो तर आपण त्या क्षेत्रात डोकं लावून, विचार करून काम करत अस्तांना, आपले स्वतःचे जे अनुभव तैयार होत राहतात, त्यातुन एक विशिष्ट प्रक्रिया निर्माण होत जाते, व आपला स्वतःच्या विचारांचा एक अध्यात्म तयार झालेला असतो. शेवटि कोण्यातरी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उत्पादन होतो, जे भौतिकवादी असेल, तात्विव असेल अथवा अध्यात्मीक असेल. सोबत तुमची पी.एच.डी. ओळखणारे तुमचे विशिष्ट "स्टेक -होल्डर्स" अपोआप तयार होत राहतात व वाढत राहतात. असल्या पी.एच.डीच्या कामाचा परतावा म्हणजे फ्कत स्व: अनुभव देणारा 'परमानंद' असतो, जे पैशात मोजता येत नसते. आणि जर असे काही होत नसेल व आपल्याला दुसऱ्यांच्या विचारांवर व दुसऱयांनी दिलेल्या कामावर अवलंबून राहावं लागत असेल तर तर आत्तापर्यंत आपण घेत आलेले सर्व अनुभव, आपले शिक्षण, आपण कमवलेले सर्व पैशे व जगणे व्यर्थ आहे असे समजायचे. तर तुमच्या अश्या काही पी.एच.डी. असल्या तर सांगा खाली.