द पासपोर्ट साइज फोटो हायपोथेस
द पासपोर्ट साइज फोटो हायपोथेस


माणूस जन्मतो, माणूस मरतो. किस्सा संपतो. या दोन प्रसंगामध्ये त्यांने जितकी वर्षे काढली, त्याला वेळेला तो "आयुष्य" असे नाव देतो. त्याला हे काळ फार महत्त्वाचे वाटत असते, ज्याने करून तो स्वतःचा व आपले जवळचे लोकांचे वाढदिवस दरवर्षी गाजावाजाने, नवीन पदार्थ खाऊन-पिऊन, नवीन कपडे घालून, नवीन वस्तूंचे आदानप्रदान गिफ्ट स्वरूपी करून, दरवर्षी साजरा करत करत जगत असतो व एके दिवशी मारतो. ह्या मधल्या काळामध्ये जसंजसं त्यांचं वय वाढत जातं तसंतसं त्यांच्या काही संकल्पना तयार होत जातात. शेवटी मृत्यूचे द्वारात तो या संकल्पनेच्या आधारावरच शिरतो.
आयुष्य जगत असताना मी काय केले व काय साधले, ह्या गोष्टी आपल्या जवळच्यांना व जगाला समझावे ह्याची शेवटपर्यंत माणसाची धडपड असते. ह्या धडपडीला डेव्हिड मॅक्लेलंड यांना "दी अचिवमेंट ट्रेट" किंव्हा एन.एच (Nh) ट्रेट असे नाव दिले आहे. तर, माझ्या मते, माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या मूलभूत गरजा, हे पाच स्तरांत पदानुक्रमांत विभागले जाऊ शकतात. ह्या पद क्रमानुसार ०१ म्हणजे टॉप लेव्हलची गरज आणि ०५ क्रमांकाची म्हणजे एकदम खालच्या दर्जाचे गरज. एक महत्त्वाचे इथे सांगू इच्छितो की सर्व गरजा तेवढेच महत्त्वाचे असले तरी, एकेक सोडत सोडत ०१ नंबरचा उच्चांक गाठावा लागतो. आता हा प्रश्न की किती लोक हे उच्चांक गाठतात अथवा गाठू शकतात हे वैयक्तिक आहे.
तर मी माझे "पासपोर्ट फोटो हायपोथेसिस" जे इथे मांडणार आहे त्याची सुरुवात ५ व्या क्रमांकाच्या गरजापासून करु इच्छितो व अंत: ह्या मी माझ्या मेंदूत सहजपणे आलेल्या ह्या "हायपोथिसिस"चं स्पष्टीकरण करेन. पटलं तर आणि नाही तरीही कृपया कमेंटा. माझा "पासपोर्ट हायपोथिसिस" ठेवण्याचा उद्देश हा की माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्या पाच गरजा समोर ठेवून त्याने प्रेरित होऊनच तो जगत असतो. जोपर्यंत त्याला पुढच्या म्हणजे वरच्या क्रमांकाची गरज भासत नाही तो पर्यंत तो एका विशिष्ट गरजेच्या प्रेरणेवर अथवा तिथे भेटणारे आनंदावर अटकून बसलेला असतो व तिथेच जगत असतो व एखाद्या वेळेस तिथेच त्यांचे आयुष्य संपते. काहींना आयुष्यात एका विशिष्ट वेळेनंतर, एका क्रमांकावर आयुष्याचे काही वर्षे काढल्यानंतर, लक्षात येथे की आपल्याला आता पुढचा क्रमांक गाठायचा आहे आणि ते सध्याचा क्रमांक सोडून वरच्या क्रमांकावर आपल्या आयुष्याला नेतात. या पदक्रमांकांची गमतीचे नियम हे की तुम्हाला एक क्रमांक सोडूनच दुसऱ्या क्रमांकावर जाता आले तरच तुमची धडपड यशस्वी झाले असे आत्मआभास किंवा परमानंद होते.
(०५) सर्वात खालच्या पातळीवर म्हणजे ५ व्या क्रमांकावर आपल्या मूलभूत गरजा हे शारीरिक असतात, जसे तहान, भूक, झोप, प्रज्वलन क्रिया म्हणजे सेक्स व इत्यादी. हा गरजेसाठी तो काम करतो पैसे कमवितो व आपल्या या शारीरिक गरजा पुरवितो. ह्या लेवलचे त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे "कशासाठी जगायचं तर शेवटी पोटासाठीच ना!" हे असते. चांगले खाणे, चांगले कपडे, चांगले जीवनासाथी" मिळवणे हेच त्याच्या मूलभूत गरजा. तो पैसे कमवून ह्या गरजा पुरवतो व इथे बराच काळ आनंदात काढल्यानंतर त्याला दुसरी गरज अपोअप भासते.
(०४) या गरजेपेक्षा थोडी श्रेष्ठ गरज म्हणजे चौथ्या क्रमांकावरची "सुरक्षितता गरज". चांगले खायला भेटत आहे, चांगला संसार उभा झाला आहे, आपण इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ कपडे घालू शकतो ह्या गोष्टींसाठी आपल्याला धडपड करावं लागत नाही, तेव्हा पुढची दुसऱ्या क्रमांकाची गरज भासते. ही गरज आहे स्वतःच्या मालकी हक्काच्या घराची. म्हणजे ऊन पाऊस सर्दी व दुसर्या प्राण्यांपासुन रक्षणासाठी एक अपलं स्वतःचा घर. काम करणाऱ्याला पैशाची कमी नाही पैसे येत जातात स्वतःचा घरही होऊन जातो या दुसऱ्या क्रमांकावर आनंदात तो बरेच वर्ष काढतो. पण समाधानाचा मानसिक घर अजून त्यांच्या आवाक्या पासुन खूप दूर असतो. या दुसऱया क्रमांकाची गरज गाठण्याच्या धडपडीत तो "प्रेम करणे" व “करून घेणे” विसरलेला असतो व अचानक ह्या गोष्टी त्याला आठवतात. तिसऱया क्रमांकाच्या गरजा म्हणजे "भावनात्मक गरजा" त्याला भासू लागतात.
(0३) एक मुलगा मुलीला भेटतो, लगेच प्रेम होते, जागाशी भांडून ते लग्न करतात आणि स्वतःच्या घरात आनंदाने राहतात हे फक्त जुन्या काळाच्या सिनेमांमध्ये होत असे आजचा काळ सुसाट व “सैराट”चा आहे. तिसऱया क्रमांकाचा आयुष्य गाठल्यावर त्याला, "आपल्यावर खरंच कुणी प्रेम करतो का, आणि खरंच करत असतील तर ती व्यक्ती कोणती आहे हे जाणून घ्यायची त्याची तगमग व त्यातून येणारे वेदनांचे समाधान म्हणजेच "भावनात्मक गरजा". ईथे एक मुख्य प्रोब्लेम हे आहे की त्याला वाटते की संपूर्ण जगानेच त्याच्यावर प्रेम करावे, पण असे होत नसते हे त्याला माहित असून सुद्धा ह्या गोष्टी साधण्याची त्याची धडपड त्याला पुढच्या क्रमांकाच्या गरजावर नेतात. ह्या भावनात्मक गरजेच्या अभावामुळे तो प्रेम या भावनेचा शोधात निघतो. काही इथे भयंकर चुकतात व स्वतःचे व दुसऱ्याचे आयुष्याचा खेळखंडोबा करतात. काही लोकं प्रेम ह्या संकल्पनेला मानवतेशी व देवाशी जोडून उच्चस्तरावर नेतात व काही तर हा क्रमांक गाठू सुद्धा शकत नाही.
या शेवटच्या तीन गरजा माझ्या मते खालच्या दर्जाचेच आहेत, कारण या सर्व वर्तणूक आपल्याला प्राण्यांमध्ये सुद्धा बघण्यात येते. उदाहरणत: एखाद्या कुत्र्यालाही तहान भूक लागते, तोही वेळ व सीझन आला की प्रज्वलन करतो, त्यालाही एक घर सापडते, घरच्या मालकांवर व मालिक त्यांच्यावर अनंत प्रेम करत राहतो. कुत्रं मेल्यावर रडणार्यांचे तर व्यथा व कथा तर, माणूस मेल्यापेक्षा जास्त दिवस चालतात. तर आयुष्याच्या मार्गावर जगत असताना या तीन गरजा आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये सारखेच, त्यामुळे माझ्या मते हे सर्व, खालच्या दर्ज्याचे. मानव हा सामाजिक प्राणी आहे मानवी जीवनात जगत असताना पुढचे दोन क्रमांक आपल्याला गाठता आल्या तर जगणे यशस्वी झाले असे मी म्हणेल.
(0२) दुसर्या क्रमांकाची गरज आहे "सेल्फ एस्टीम निड्स" म्हणजे समाजात "स्वतःविषयी चांगले मत" निर्माण करण्याची गरज व धडपड. इथे माणूस आपण जिथे राहतो, जगतो त्या समाजासाठी आपले काही तरी देणे आहे असे समजुन तो समाज सेवेकडे वळतो. इथे तो वेगवेगळ्या प्रकाराचे दान करतो, हॉस्पिटल्स काढतो, निरनिराळ्या संस्था, शाळा व कॉलेज काढतो. पैसा भरपूर अल्याने तो पैशांची काळजी न करता स्वतःच्या नावाचे जतन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत "स्वतःविषयी चांगले मत" (सेल्फ एस्टीम) कसे पोहोचवता येईल याचे प्रयत्न करत असतो. हे सर्व साधत असतांना पन्नाशी ओलांडलेली असते व आयुष्य संपवण्याच्या मार्गावर अस्ते व अजून एक उच्चतम क्रमांक गाठण्याचा काम राहिलेला असतो.
साधे सोपे गणित आहे की हे शेवटचा उच्चांक गाठायचा असेल तर मागचे सर्व क्रमांक आयुष्यात ज्यांनी लवकर संपवलेले असतील त्यांच्याकडे शेवटच्या क्रमांकावर जगण्यासाठी भरपूर वेळ असतो. इथे शेवटच्या क्रमांकावर दोन गरजा असू शकतात एक "अध्यात्मिक गरज (स्पिरीच्युअल निड्स) व दुसरे "आत्म-वास्तविकीकरण" (सेल्फ एॅक्चुअलायझेशन निड्स) व त्यांच्यावर आपण आपण वादविवाद स्पर्धा मांडू शकतो. पण इथं मी जे सांगणार आहे ते आहे "आत्म-वास्तविकीकरण" (सेल्फ एॅक्चुअलायझेशन) वर. कारण अध्यात्म किंवा "स्पिरुचियालीटि" हे प्रत्येक माणसाच्या अवकातिची गोष्ट नाही. अध्यात्माचा चहा बनवून पिणे हे सर्वांच्या नशिबात नाही. पण "सेल्फ एॅक्चुअलायझेशन" हे प्रयत्न केल्यावर सर्वांना जमणे शक्य आहे. तर शेवटी "सेल्फ एॅक्चुअलायझेशन" म्हणजे काय व अंतत: माझे द "पासपोर्ट फोटो" हायपोथेसिस.
(०१) "सेल्फ एॅक्चुअलायझेशन" ही एक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याची गरज असते हे खूप लोकांना माहितच सुद्धा नाही. आयुष्य जगत असताना आपण आपल्या अवती-भवती, समाजात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, व कदाचित कळत नसेल तर, स्वत: मध्ये सुद्धा, बघतो की आपण पहिल्या, दुसर्या किंवा तिसऱ्याच क्रमांकावर अडकून जगत असतो व कुत्र्यासारखे तिथेच मारतो. काही जीवनाच्या संघर्षात पुढचा टप्पा गाठू शकत नाही, हे जरी खरे असले तरी स्वतःची ताकद व त्यातून येणारे समाधान, या गोष्टी जीवनाच्या संघर्षांशी अलिप्त असतात. उदाहरण द्यायचं झालं तर नुकत्याच केरळमध्ये आलेल्या पुरात, मुख्यमंत्री निधीला देणगी म्हणून ९४ रुपये, मोहनन नावाच्या एका भिकाऱ्यांनी दिले. ती क्षमता त्याचीच व त्यातून मिळणारे समाधान सुद्धा त्याचेच.
"सेल्फ एॅक्चुअलायझेशन" म्हणजे अपण या पृथ्वीतलावर का जन्मलो व खाऊन, पिऊन, जगत इतपर्यंत आल्यानंतर आपल्यात काय काय क्षमता आहेत व ते वापरुन आपल्याने थोडे तरी चांगले कसे झाले असते किंवा होईल याचा किंचितजरी भान असणे, जागृत होणे व नेहमी जपुन ठेवणे. हे भान ठेवून जे काम करतात त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या "उच्चतम टप्पा" गाठला आसे मी म्हणेल. अशी लोक भ्रामक कल्पनेत जगत नाही, त्यांना सत्याची परिपूर्ण ज्ञान असते व ते कधीच काल्पनिक मोहजाळात फसत नाहीत. ते आत्मज्ञानी असतात व स्वतंत्र विचाराने जगत असतात व स्वत:च्या अनुभवाच्या आधारावर ते आपले भाष्य व कृत्य करत असतात. असे करत व जगत असतांना सुद्धा ते नैसर्गिकरीत्या नम्र असतात व किंचितही त्यांच्या मध्ये ढोंगीपणा अथवा दुसर्यांची उगीच बढाई करण्याची सवय नसते. विचारांमध्ये ताजेपणा व स्वभावामध्ये नैसर्गिक कृतज्ञता त्यांच्यात सामावलेली असते. ते समाजात, परिवारासोबत, मित्रांमध्ये व एकट्यापणातही कमालीचे तेवढेच आनंदी असतात. हे "सेल्फ एॅक्चुअलायझेशन" चा टप्पा ज्यांनी गाठला त्यांना वेगळे गीता, कुराण, बायबल, किंव्हा ग्रंथ साहेब वाचायची व अधिक समझून घ्यायची गरज नाही. त्यांनी जीवनाच्या तत्त्वांची उच्चांक गाठलेली आहे. असले लोक आपल्या वयाच्या ६०, ७०, ८० नाय तर १०० व्या वर्षी सुद्धा आनंदी राहू शकतात. आता छाती ठोकून “हो मी बी असाच जगतो ची पुंगी नका वाजवू राव ” कारण जगात अशी व्यक्ती फक्त १% टक्के आढळतात म्हणे बुवा.
येवढे कमी का? तर स्वतः बघा, वय वाढले तरी अजून नवीन नवीन चांगला काय खायला-प्यायला भेटते याची धडपड, तर शुगर बी.पी. वर सुद्धा येऊन थांबत नाही, "मरने काच है तो खा-पी के ऐश के साथ मरेंगे" म्हणतात ना तसे . कपड्यांचा मोह तर अशी कि शेवटी फक्त २ x ७ फुटाचा पांढरा कपडा आपल्या तिरडीवर लागतो हे अपल्या लक्षात सुध्दा राहत नाही. वडिलोपार्जित मालमत्त्यासाठी व घरच्या एक व दोन फुट जागेसाठी, आपसात भांडणारे व सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट गाठणारे तिसऱया व चौथ्या पिढीचे किस्से मी ऐकेलेले व बघितलेले आहे. व्यवस्थित जीवनासाथी व होतकरू लेकरं बाळ असून १७शे६० लफडे करणारे अन् "जेवण झालं काय" हे विचारणारे तुम्ही बघितलेले आहेतच की.
तर वरच्या सगळ्या गोष्टींना अनुसरून माझे "द पासपोर्ट साइज फोटो हायपोथेसिस ऑफ लाईफ" असे आहे की निसर्गाने आपली शरीररचना कितीही विकसित केलेली असली तरी माणूस ऊरतो शेवटी पासपोर्ट सायझ फोटो इतकाच. मृत्युमुखी त्यांचे पाय गळालेले असतात, कंबरेचा भाग निष्फळ झालेला असतो, पोटातली भूक मेलेली असते, हृदयाचे ठोके अनियमित झालेले असतात. आणि जगात कुठेही ह्या सर्व अवयावांची पासपोर्ट साइज फोटो मध्ये समावेश अथवा नोंद घेतली जात नाहि, कारण छाती खालच्या भागांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी व्हॅल्यूच नाही. मेल्यानंतर सुद्धा छातीचा वरचा भागच भिंतीवर खिळा ठोकून हार लावून लावला जातो, याचेही काही कारण असेलच ना. कारण छातीच्या वरच्या अवयवांचा उपयोग त्याने स्वतःसाठी, अपल्या परिवारासाठी व समाजाच्या हितासाठी मरेपर्यंत केलेली असते किंवा नसते. जेव्हा शेवटी पायापासून डोळ्यांपर्यंत सर्व अवयव गळून पडतात पण आपले मेंदू ठिकाण्यावर राहते तोच माणूस "सेल्फ एॅक्चुअलायझेशन" च्या उच्चांक १ नंबरची गरज गाठून आपले आयुष्य यशस्वीरीत्या जगला असे समजू. शेवटी जीवनात आपल्या क्षमतेपेक्षा किंचितही खालच्या क्रमांकांची प्लॅनिंग करून जगणे, म्हणजेच दुखांना निमंत्रण देणे असेच आहे. शेवटी नशिबात व चांगल्या कर्मात जगलेले असले तर आपलं उरेल ते फक्त आपलं “पासपोर्ट साईझ फोटो”