Akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

Akshata alias shubhada Tirodkar

Others

अहंकार

अहंकार

3 mins
611


साक्षी एक हुशार मुलगी मोठ्या कंपनीत बऱ्या पैकी पोस्ट वर काम करत होती तिच्या कतुर्त्वाची शिफारस सगळेच करायचे एवढ्या कमी वयात तिनी कामात खूप यश मिळवलं होत .तिच्या डिपार्टमेंट मध्ये समीर तिचा सहकारी होता प्रोजेक्ट वैगेरे ते दोघे मिळून करायचे .


साक्षीला समीरचा स्वभाव खूप आवडायचा त्याच्या मैत्रीने कधी नात्याचं रूपांतर घेतलं होत आणि दोघांनी त्यावर शिकामोर्बत केला होता ..


ते दोघे पण खूप खुश होते एकमेकांच्या सहवासात दिवस जात होते सगळे सहकारी समीरला खूप नशीबवान म्हणायचे त्याला साक्षी सारखी जीवनसाथी मिळाली म्हूणून समीरपण साक्षीच्या कुर्तृत्वाचा मोठेपणा मिरवायचा


दिवस सरत होते साक्षी आणि समीर मनाने खूप गुंतले होते पण म्हणतात ना चांगल्याला वाईटाची किनार असते आणि नेहमी तसेच झाले ...


समीरला नेहमी तू नशीबवान आहेस हे आता जड वाटू लागल त्याला आपण का नशीबवान आपण काय साक्षी पेक्षा कमी आहे असच वाटू लागला साक्षीच्या कुर्तृत्वाचा मोठेपणा त्याला असहाय होऊ लागला त्याचा स्वभाव हळू हळू बदल जात होता साक्षीला पण तो खटकत होता पण तिनी एव्हडा लक्ष नाही दिला .


दिवस जात होते एक महत्तवाचे प्रोजेक्टसाठी साक्षीला आणि समीरला जबाबदारी दिली होती आणि सगळयांना माहित होते कि हे प्रोजेक्ट खूप महत्वाचे आहे कंपनीच्या बॉस ना साक्षीवर भरोसा होता कि हा प्रोजेक्ट आपल्यालच मिळणार ...


प्रोजेक्टची महत्वाची जबाबदारी साक्षीला दिली म्हूणन समीर आतून खूप रागावलेला इथेच मीठाचा खड्डा पडला ...


दुसऱ्या दिवशी ते दोघे कॉफी पिण्यासाठी बसलेलें तेव्हड्यात समीर साक्षीला म्हणाला मला तुच्याशी थोडं बोलायचं आहे .साक्षी त्याला पाहत म्हणाली "तुला कधी पासून माझ्याशी बोलण्यासाठी परवानगी घावी लागते बोल ना समीर म्हणाला" हे बघ साक्षी मला प्रोजेक्ट विषयी बोलायचे आहे मी सपष्टच बोलतो तू सरांना सांगून टाक तुला हि महत्वाची जबाबदारी नाही जमणार तुम्ही समीरला ती जबाबदारी द्या मी त्याला मद्दत करेन "


एकटक समीर कडे पाहणारी साक्षीच्या चेहरयाचा रंग बदला" काय तू हे काय बोलतोस मी हे सगळं का करू आणि आज पर्यत मी कोणतीच जबाबदारी नाही झडकली आणि मी आता का म्हूनन करू "समीर म्हणाला म्हणजे "तू माझ्या साठी एव्हडं नाही करू शकत माझ्यासाठी जर तू जरा माघार घेतलीस तर काय बिघडल."

साक्षी ने उत्तर दिले "तुच्या साठी हे बघ समीर आपले व्यकीत आयुष्य इथे आणू नकोस आपण कामाबद्दल एकमेकांचे सहकारी आहोत आणि बॉस ना वाटलं कि मी जबाबदारी पेलू शकते म्हूनन त्यानी मला दिली नाही तर त्यानि तुला दिली असती "


समीर - "वाह वाह म्हणजे तुला असं म्हणयच आहे कि मी तुच्या एव्हडा हुशार नाही तुला सगळ्यांना दाखवायाच असणार कि कसा मी नशीबवान आहे कारण तू माझ्या सॊबत आहेस सगळेच तेच म्हणतात कंटाळा आला मला हे एकूण तू लालची झाली आहेस शाबासकी घेण्यासाठी तुला काय वाटत तूच आहेस इथे हुशार "

साक्षी- " छान चांगला बोलास तू नाही तूचा पुरुषी अंहकार बोला तो मी कोणाला माझी तारीफ करा म्हूनन नाही सांगत आणि मी शाबासकीची लालची पण नाही आहे मी आज वर चे कमवाल ते माझ्या कर्तृत्वावर कमावलं आणि हो ह्या चा मला अभिमान आहे हि जबाबदारी हि मी रोख पूर्ण करणार तुला काय सांगायच आहे ते बॉस ना सांग उद्या पासून प्रोजेक्टच्या कामाला सुरवात करूया आठ दिवसच आहेत आज पासून/" आणि ती तिथून निघून गेली .


दुसऱ्या दिवशी समीर निमुटपणे कामाला लागला आता ते फक्त सहकाऱ्यासारखे वागत होते. त्याच्यातला तो आपलेपण कुठे तरी रुसला होत दोघांना एकमेकाविषयी वाटत होत.. पण दोघांचा इगो त्याना महत्वाचा होता कोणीच कोणाशी बोलायचं प्रयत्न करत नव्हते ...


असेच दिवस गेले प्रोजेक्ट कंप्लेंट झाला आणि प्रोजेक्ट कंपनीला मिळालं साक्षीच्या आणि समीर च्या पाठीवर शाबासकी पडली पण बॉस ने "साक्षी यु डिड इट महत्वाची जबाबदारी चोख पार पडलीस आणि समीर वेल डन "


पण परत साक्षीच गुणगान ऐकून समीरचा चेहरा लाल झाला होताआणि साक्षीने तो पहिला आज साक्षीला न जाणो का हे कौतुक वैगरे नकोस वाटत होत ती घरी पोहोचली निवांत एकटी बसली आणि लॅपटॉप वरून तिनी कंपनीच्या बॉसला राजीनामा मेल केला मोबायलवरून समीरला मेसेज टाकला "मला एवढ्या अहंकारी माणसासोबत माझं आयुष्य काढायचं नाही त्या साठी मी आपल्या नात्याला पूर्णविराम देते .आणि तिनी समीरचा नंबर डिलीट करून टाकला

आणि नव्या सकाळच्या आशेने ती पहुडली ....


Rate this content
Log in