#आवडते पौरोणिक पात्र
#आवडते पौरोणिक पात्र
आवडते पौरोणिक पात्र म्हणजे हनुमान . एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामाचे महान भक्त, दास, दूत मानले जातात . त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हे अतिशय ताकदवान-महाबली होते . त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या.
हनुमान हा सप्त चिरंजीवीपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे ते अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतात, असे म्हणतात.