आनंदाच्या या रानवनात...
आनंदाच्या या रानवनात...
1 min
677
पावसाच्या सरींसोबत
हळूहळू स्वतःला हरवणं
किती अनोखं असतं ना
ते पाऊस प्रेम नि
आपलं सोबत रेंगाळणं
अनेक आठवणींना
उजाळा देणारे क्षण
नकळत झेपावतात नि
आसवांचा सागर मिटवून
आनंदाचं रान वसवतात
वेगवेगळ्या नात्याला
बहर वेगवेगळा
नवखं असलेलं विश्व
पुन्हा पुन्हा सामावतं
आनंदाच्या या रानवनात
