Nasa Yeotikar

Others

2.9  

Nasa Yeotikar

Others

आजचा युवक

आजचा युवक

5 mins
33.2K


चला युवकांनो देश घडवू या!

जगात लोकसंखेच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. आज भारत देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी च्या वर पोहोचली आहे. यात 20 % बालक आणि 20 %  वृध्द तर बाकी 60 % च्या वर तरुणाची संख्या आहे हे विशेष म्हणूनच भारताला तरुणाचा देश असे संबोधले जाते. ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाची संख्या असेल तर त्या देशाची प्रगती लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. पण नेमके उलट या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या कडे मनुष्यबळ, शक्ती आणि युक्ती सर्व आहे, तरी भारत आज स्वातंत्र्याच्या सत्तरीत असून देखील प्रगती पथावरच आहे म्हणजे अजूनही रस्त्यावर आहे त्याला अजून खूप काही करणे शिल्लक आहे. असे का? आज आपण जपान या देशाच्या विकासाकडे पाहिलो तर लक्षात येईल की त्या देशाने कमी वेळात एवढी प्रगती कशी केली असेल? त्याला एकमेव कारण म्हणजे तेथील कोणताच व्यक्ती रिकामा नसतो, बेरोजगार नसतो. तो सदानकदा काही ना काही काम करीत असतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे गौतम बुध्दाचे वचन त्यांनी आत्मसात केले म्हणून आज जपान मधील प्रत्येक वस्तु देश विदेशात आढळून येते. वास्तविक पाहता जपानची लोकसंख्या भारतच्या तुलनेत फार कमी आहे परंतु तेथे बेरोजगार कमी आहेत हे विशेष. त्याउलट आपल्या देशात दिसून येते. येथे आपल्या देशात आळस हा माणसाचा शत्रू नसून मित्र बनला आहे. काम करणाऱ्या युवकापेक्षा बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ आहे. व्यक्तीच्या हाताला काम असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या व्यक्तीचा विकास होत नसून त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होतो. परन्तू आपल्या देशातील युवकांना रोजगार का मिळत नाही किंवा युवक असे भटकण्याच्या कोंडीत का सापडत आहेत? यावर विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या शंभरीत तरी भारत जगाच्या नकाशावर ठळक उठून दिसण्यासाठी आज या समस्येची उकल शोधणे किंवा यावर संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 बेरोजगार युवक - देशात सध्या दोन प्रकारचे बेरोजगार युवक आढळून येतात. अशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगार. अशिक्षित मंडळी त्यांना ज्याप्रकारचे काम जमते त्याप्रकारचे काम ढोर मेहनत करीत करतात. त्याचा म्हणावा तसा मोबादला त्याला मिळत नाही म्हणून खूप कष्ट आणि काम करून देखील त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास होत नाही. त्याच्याकडे शक्ती आहे, मात्र त्या शक्तीचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे त्याची पूर्ण मेहनत त्याचा विकास करू शकत नाही. त्यासाठी या युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या किमतीची जाणीव करून द्यायला हवी. अश्या बेरोजगार युवकाची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र सुशिक्षित बेरोजगार युवकाची संख्या भरपूर आहे ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या विकासवर होत आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की तो भारताचा सक्षम नागरिक बनतो. त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या वयापर्यन्त त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. येथून पुढे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणार असते. या वयात घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. येथील निर्णय अचूक असणे आवश्यक असतात आणि येथेच चूका होताना दिसून येत आहे म्हणून खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेताना मुलांना भविष्यातील त्यांचे चित्र दाखविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून येथे करायला पाहिजे. काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख येथे झाल्यास मुले त्या अभ्यासक्रमाकडे वळू शकतील. त्यांच्या मध्ये व्यवसाय विषयी गोडी निर्माण होईल. सर्वच मुले हुशार नसतात त्यामुळे त्यांच्या क्षमता ओळखून तसे शिक्षण घेण्याची सुविधा या स्तरावर मिळाले तर योग्य राहते. मात्र याच ठिकाणी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि भविष्यात ते भटकतात. एखादे कौशल्यपूर्ण शिक्षण पूर्ण केल्यास शिकलेल्या माणसाला त्यात मार्ग सापडतो. मात्र युवक या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत. त्यांना बेकार फिरणे आवडत आहे मात्र काम करणे अजिबात आवडत नाही. कारण त्यांना या विषयी काहीच गंध नसतो, त्यांच्या मध्ये काम करण्याची चेतना जाग्याच केल्या जात नहींत. आज श्रमप्रतिष्ठा हे मूल्य कमी होत चालले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचाच विपरीत परिणाम युवकाच्या जीवनावर झाला आहे किंवा होत आहे. रिकाम्या माणसाच्या डोक्यात भुताचा वास असतो असे इंग्रजीत एक वाक्य आहे त्यानुसार बेरोजगर युवक म्हणजे रिकामी डोके त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी भुताचा वास असतो. ते देशाच्या प्रगतीचे विचार करण्याऐवजी देश विघातक किंवा वाईट काम करण्यास प्रवृत्त होत आहेत. समाधानकारक जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पैसा आणि पैसा कमविण्यासाठी काम करावे लागते. दे रे हरी पलंगावरी च्या वृत्तीनुसार आळसी बनलेल्या युवकांना काम न करता झटपट खूप पैसा मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी ते कोणतेही काम मग ते चांगले असो किंवा वाईट याचा अजिबात विचार न करता काम करायला तयार असतात. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. देश विघातक कार्य करणारे काही समाजकंटक लोक अश्या गरजू युवकाना अलगद जाळ्यात अडकवितात आणि मग सुरु होतो त्याचा जीवघेणा प्रवास. ते अश्या दलदल मध्ये फसतात की त्यांची ईच्छा असून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही. दहशतवादी किंवा नक्षलवादी बनण्यात युवकाची संख्या मोठी असण्यामागे हेच कारण नसेल कश्यावरुन ?
हाताला काम नसल्यामुळे हे युवक वाईट व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत. दारु पिणे, तंबाखू खाणे, चरस, गांजा, अफु याचे सेवन करणे आणि समाजात गैरवर्तन करणे असे प्रकार वाढीस लागले त्यास फक्त एकच कारण आहे ते म्हणजे युवकाच्या हाताला काहीच काम नसणे. त्यामुळे युवकास काम देणे गरजेचे आहे. रिकामटेकडे इकडून तिकडे फिरणे, दिवसभर अन रात्रभर फेसबुक आणि व्हाट्सएप्प सारख्या सोशल मिडियाचा जास्त वापर करणे, मित्रासोबत अवांतर गप्पा मारत बसणे याशिवाय सध्या युवकांना दूसरे काहीच काम दिसत नाही. सुखदेव राजगुरु आणि भगत सिंग यांच्या सारखी स्फूर्ती आजच्या युवकात दिसून येत नाही कारण आज आपण स्वतंत्र आहोत आपणास त्यासाठी कोणाला भांडण करत बसायचे काम नाही. याची जाणीव त्यांना झाली आहे. सर्व काही आयते मिळत आहे त्यांना त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज नाही. मुले रिकामी हाताने फिरत आहेत याची काळजी त्या युवकापेक्षा त्याच्या पालकाना जास्त आहे. शिक्षण घेतलेला युवक आज शेतात काम करायला तयार नाही. मग एवढं शिक्षण घेऊन काय फायदा असे त्याचे बोलणे असते. यात युवकाची स्थिती मात्र धोबी का कुत्ता सारखी झाली आहे ना घरचा ना घाटचा. काम नसलेल्या व्यक्तीला समाजात दुय्यम स्थान असते असे म्हणण्यापेक्षा कुणी ही विचारत नाही. समाजात आपली पत आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
देशातील गलिच्छ राजकरणाचे युवक बळी पडत आहेत. हुशार राजकारणी मंडळी या युवकांचा निवडणुकीच्या कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि निवडणूक संपल्यावर वाऱ्यावर सोडून देतात. काही ठिकाणी असे दिसून आले आहे की बरीच नेते मंडळी आपल्या सोईसाठी काही युवकाचे पालनपोषण करतात. त्यांना आळशी बनवितात. यामुळे आत्ता युवकांनी जागे होऊन स्वतः राजकारणात शिरकाव करणे आवश्यक आहे त्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता आपण रोजगार तयार करणे देशाची गरज आहे. आज भारत देशाला नरेंद्र मोदी सारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगाचा भारत देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोण देखील बदलला आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रम देशात चालू झाले आहेत. आज देशाला हुशार, उद्योगी आणि कर्तबगार युवकाची खरी गरज आहे. युवक मित्रांनो आळस झटका आणि कामाला लागून एक समृद्ध भारत घडवू या.

-

 

 

 


Rate this content
Log in