वजनदार
वजनदार
1 min
15.8K
चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना
धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना
सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार
चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार
मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या
चवीसाठी खाल्ल्या दोन खोब-याच्या वड्या
योगासने करायची मग झाली वेळ
पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ
व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून
जेवणासाठी घेतले गरम वडे तळून
मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम
मनःशांतीसाठी केला थोडा आराम
संध्याकाळ होताच जॉईन केले जिम
घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम
वजन घटण्यासाठी चालत गेले घरी
डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी
दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हंटले
इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले
कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे
वजनकाटा चुकला कसा? 🤔 मला पडले कोडे!
