STORYMIRROR

Vaikhari Joshi

Others

3  

Vaikhari Joshi

Others

प्रेमाची भाकर

प्रेमाची भाकर

1 min
12.7K


ती म्हणाली, तु असाच आहेस

नेहमीच माझ्या चुका काढतोस

छोट्या छोट्या गोष्टीवरून

उगाच माझ्याशी भांडतोस


तावातावाने तो म्हणाला

चुका नसतात छोट्या

येता-जाता तूच करते

माझ्या तक्रारी खोट्या


धुसफुसत म्हणाली रागाने

हे बरं जमतं तुम्हाला

नवरेशाही गाजवता तुम्ही

दोष मात्र आम्हाला


दात ओठ खात त्याने विचारलं

अगं, नवरेशाही कसली ?

तुझ्यावरच्या प्रेमासाठी

मी कितीदा भांडी घासली


'तुझ्या संसारासाठी झीजते मी'

तीनेही मग सुनावले

बोलता बोलता नकळत तिचे

डोळे भरून पाणावले


अश्रू बघताच डोळ्यात तिच्या

त्याला कसंसच वाटलं

तिच्यावरचं प्रेम क्षणांतच

डोळ्यात त्याच्या दाटलं


नाराजीचा सूर मग

तिचाही थोडा मावळला

"माझंच जरा चुकलं "

म्हणताना राग तिचा निवळला


मला तू आणि तुला मी

कायम सोबत राहू

रुसव्यांच्या चटणीबरोबर

प्रेमाची भाकर खाऊ !!


Rate this content
Log in