STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Others

3  

Mrs. Mangla Borkar

Others

विज्ञान - आध्यात्म

विज्ञान - आध्यात्म

1 min
312

विज्ञान आमचा विश्वास आहे

आध्यात्म आमचा श्वास आहे. 


विज्ञानामध्ये शोध आहे,

आध्यात्मामध्ये बोध आहे.


विज्ञानामध्ये पराक्रम आहे,

आध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे.


विज्ञानामध्ये शक्ती आहे,

आध्यात्मामध्ये भक्ती आहे.


विज्ञानामध्ये पुरुषार्थ घडतो,

आध्यात्मामुळे परमार्थ घडतो.


विज्ञानाकरीता उपकरणाची आवश्यकता आहे,

आध्यात्माकरिता अंतकरणाची आवश्यकता आहे.


विज्ञानामुळे परिस्थिती बदलते,

अध्यात्मामुळे मनस्थिती बदलते.


विज्ञानामुळे धन निर्माण होते,

आध्यात्मामुळे समाधान मिळते,


विज्ञान आणि आध्यात्माच्या साथीने,

मनुष्याची परिपूर्ण प्रगती घडते.


Rate this content
Log in