वैशाखाच्या ऊन्हामध्ये
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
लागे ग्रीष्माची चाहूल
आग भास्कर ओकतो |
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
जीव माझा लहाकतो ||१||
पारा चढला सूर्याचा
झाला मन हा व्याकुळ |
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
होतो जीव मळमळ ||२||
तापलेल्या किरणाने
बसे चटके या अंगा |
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
वाहे घामाच्या या गंगा ||३||
भुमी तापते खुपच
आग होते या पायाची |
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
लाही होते या जीवाची ||४||
घसा पडला कोरडा
लागे तहान या जीवा |
वैशाखाच्या ऊन्हामध्ये
थंड पिण्यासाठी हवा ||५||