वाटलं कविता करावी
वाटलं कविता करावी
1 min
224
आज वाटलं एखादी कविता करावी
पण काही सुचत नव्हता
काय लिहावं कुठला विषय घ्यावं
प्रेमाचा आनंद की विरहाची वेदना
सुखाची अनुभूती की दु:खाची कल्पना
मैत्रीचे मर्मबंध की मनाने जोपासलेले छंद
स्वप्नांचा सुंदर हिंदोळा की
नात्यान मधला जिव्हाळा
बालपणाचा तो निरागस सहवास
की तरुणाईच्या वाटेवरचा प्रवास
काय लिहावे कसे सांगावे
भावनांचे हे सुंदर चित्र
शब्दरुपात कसे मांडावे
