Untitled
Untitled
जीवन गाणे गातच रहावे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वात दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे |
जीवन गाणे गातच रहावे
कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातुन
कधी वन्यातून , कधी तान्यातून
झूळझुळतात तराने |
जीवन गाणे गातच रहावे
गा विहंगानो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याही सुरातुन
उसळे प्रेम दिवाणे |
