Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

तू येशील ना....

तू येशील ना....

1 min
243


पिंगा घालणाऱ्या वाऱ्याला भेटायला

तू नाही म्हटले तरी

तो तुला छेडत असतो

तुझ्या रेश्मी केसांना उडवत असतो

तू डोळे बंद करून

बट केसांची मागे घेत असते

हलगत हळुवार 

हाताच्या कुपीत चेहरा तुझा लपवत असते

तू येशील ना...... 

सावळ्या पहाटेला भेटायला


त्या गोड गोजीऱ्या कळ्यांनाही

तुला बघायच असतं

तुझ्या स्पर्शाने त्यांना

फुलायच असतं

तुला पाहील्यावर

 कळ्या झुलतं असतात

एकमेकींना कवेत घेवून फुलतं असतात

त्यांच उमलनं पाहून

खळी तुझ्या गालावरची हसत असते

तेव्हाच तू सुदंर खुप दिसतं असते

तू येशीलना....

बाग फुलांचा बघायला


तू आल्यावर बहर फुलांचा बावरा होतो

तुला पाहिल्यावर

भवरा सैरभैर होवून वेडावतो 

तुला पाहून दवबिंदू ही इथेतिथे घरंगळत असतात

आनंदाच्या भरात मातीच्या कुशीत शिरत जातात 

गंध फुलांचा दरवळताना

तू मंत्रमुग्ध होत असते

फुला फुलांना स्पर्श करून

 ह्रुदयाशी लावत असते

तू येशीलना....

सडा फुलांचा वेचायला.


रोज सकाळीस फुले

तू येण्याची वाट बघत बसतात

परडीतल्या परडीत ते भांडत असतात

तुझ्या वेणीवर त्यांना

गजरा होवून बसायच असत

तुझं लाजर रूप त्यांना डोळे भरून बघायच असतं

तू येशील ना...

शृंगार तुझा आरशात बघायला 


Rate this content
Log in