तुझाच मी
तुझाच मी
1 min
411
चालता बोलता उगा
येता जाता भेटता उगा
छोट्या छोट्या गोष्टीत
रुसू नको उगाच
फुगू नको उगाच
सारखा सारखा
राग लटका नको
नको तक्रार उगाच
बोललो नाही तरी
उत्तर नसले जरी
नसला संदेश तरीही
लगेच विसरलो
दूर जातो, टाळतो
अस काही नाही
वाचतो पहातो
बघतो सारे
संदेश तुझे
सांगणे तुझे
आठवणही तुझी
आहे मी ईथेच
आणि तिथेही
तुझ्याच जवळ
तुझ्याच समिप
येईल बरोब्बर
योग्य वेळी
गुलाबी समयी
प्रणय रंगात
श्रुंगार रसी
प्रीत बहरात
तुझाच मी
