त्रिकोण
त्रिकोण
थांबूयात आता म्हणाला होतास मागेच तू
आता वाटते खरच थांबायला हवे होते तेव्हा मी...
कळलंच नाही रे मला ही अशी कशी गुंतले
कोणत्या भोवऱ्यात या नकळत अडकले...
धागे मैत्रीचे जर फक्तआपल्या नात्यात असे
वेगळे करताना धागे गुंतत चाललेत कसे....
गुंता कसला हा मनातल्या कोंदट भावनांचा
की आवरता न येणाऱ्या विखुरलेल्या आठवणींचा...
माहित नाही मुक्त होउनही विरळ होईल का सारे
आपापल्या वाटेने वेगवेगळे आपण जाऊत का रे
पण जाणं भागच आहे मला जरी तुलाही
मला थांबवण्याची इच्छा कुठे उरलीय तरी...
आताशा तुलाही माझी सावली सलु लागलीय
मीही मनातल्या पसाऱ्याला सावरू लागलीय...
नात्यांच्याकोणत्याधाग्यातअडकायचं नाही आता
गुंतलेल्या त्रिकोणाचे कोण सुटतील कारे मी दूर जाता?
आहे अशीच राही मी माझ्या वलया मधी
जा पुढेच नको मागे वळुनी पाहूस तू कधी...