ओंजळ
ओंजळ

1 min

570
अश्व गतितील त्या वाऱ्यासवे
स्वैर उडाले विचारांचे थवे
भूतकाळातील क्षण वेचीत गेले
हाती आले काही
तर काही मुठीतुनी निसटून गेले....
वळीव कितीही कोसळला तरी
ग्रीष्मातील धरती आहे तप्त
भरूनही ओंजळ रितीच तरी
आठवांचे मेघ नाही झाले लुप्त...
हलक्याच भिजल्या भूमीच्या कुशीचा
ओला सुगंध दरवळतो आहे
दूर धुसर जगून गेलेल्या निसरड्या
क्षणांना लोचनी शोधत आहे....