सडा प्राजक्ताचा...
सडा प्राजक्ताचा...
1 min
948
पाऊस पडून गेलाय तरी
आवाज त्याचा घोंगावतोय कानात
जमीन सुकून गेली तरी
सुगंध तिचा दरवळतोय मनात ...
गरम कुरकुरीत भज्यांची चव
रेंगाळतेय जिभेवर अजून
वाफाळलेल्या चहाचे रिकामे कप
ठेवलेत कोपऱ्यात तसेच रचून ...
प्राजक्ताचा सांडलेला सडा
ओंजळीत साठवून तसाच सुकलाय
सुकलेल्या त्या फुलांचाही
गंध चहूकडे पुरून उरलाय...
पाऊस पडून गेलाय तरी
मनात ओलावा आहे तसाच
कालच्याच स्मृतीत माझ्या
आजही दडून राहिलाय असाच...