तिरंगा
तिरंगा
1 min
2.7K
ध्वजा तिरंगा प्रिय आम्हाला भूषण असे
जो भारतभूचे जगी मानसन्मान लाभूदे मानचिन्ह हे असे देशाचे
देशासाठी रक्त सांडिले मोल नसे ज्यांना प्राणांचे रंग केशरी
पोवाडे गातो त्या शहीद शूरवीरांचे २.
कृषिप्रधान देश आपुला उद्गाते आपण हरितक्रांतीचे
हरित रंग हा सांगे नाते निसर्गातल्या चिरचैतन्याचे.३.
धवल रंग असे हा द्योतक शांती आणिक पवित्रतेचे नीतिमान होऊनी आम्ही मस्तक उन्नत करु देशाचे. ४.
अशोकचक्र मधोमधी विराजे स्मरणार्थ कलिंग युध्दाचे स्मरुनी त्या प्रण घेऊ आपण अहिंसा अन् शांतीचे ..५.
लहरत राहो जगी तिरंगा मानचिन्ह हे भारतभूचे प्रणाम कोटी कोटी तयाला कोटी कोटी भारतीयांचे. ६
