तिलाही टेन्शन असत ना.....
तिलाही टेन्शन असत ना.....
ऐकते रोजच मी, टेन्शन मला लई
म्हणून आता मी, रोजचंच घेत जाईन।।
विचारलं, कसलं रे टेन्शन तुला इतकं?
म्हणे, कामाचं, भविष्याचं, तुला नाही तितकं।।
मग मी पण, वाचला टेन्शनचा पाढा
म्हणलं, चला आज एक नाही तर दोन बॉटल काढा।।
म्हणतात कसे, बायकांनी काय घेत असतात
मी पण म्हणलं, आम्हाला काय टेन्शन नसतात??
हट्टच केला, मला पण आज घ्यायची
खूप इच्छा झाली आज, झिंगायची।।
म्हणतात कसे, आरोग्याला चांगली नसते
म्हणलं, असू दे, काहीही झालं तरी आज चव चाखते।।
आज दोघेही बसू नि एकमेकांना चिअर्स करू
थोडी जास्तच झाली तर, सोबतच गटारात लोळू।।
जर पचली आज, तर रोजचीच सुरू करू
सोबतच दोघांचे पेग भरू।।
अहो, माझे नुसते बघतच राहिले,
मग, लेकरांची काळजी करू लागले।।
तुला काही झालं तर, पोरांचं कस होणार?
मी म्हणलं, तुम्हाला काही झालं तर आमचं कस होणार??
मग आलं टाळक ठिकाणावर, म्हणे आता सारं बंद
म्हणलं, उद्या करा, आज होऊ द्या थोडं, नशेत धुंद।।
