STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

4  

Sarita Kaldhone

Others

ती

ती

1 min
250

वठलेल्या निष्पर्ण तरूचं

बहरण्याचं स्वप्न बघितलं,

कष्टाचं पाणी शिंपित

समर्पणातलं सुख वेचलं...


स्वतःच्या अस्तित्वाची खूण 

दाखवत झालीस कणा,

आयुष्याची वाट खडतर

चालतेस सोडून 'मी' पणा...


जळणारी दिव्य ज्योत

उजळ तुझे भाळ,

आयुष्य दुस्तर तरी

शोधतेस नवं आभाळ...


मनावर खोल उठलेले 

हुंदक्यांचे कितीतरी उसासे,

बांगड्यांची शक्ती दावीत

समाजाचे निखळलेस फासे...


शिकली, झालीस शहाणी

ओलांडून उंबरठा गेली,

अबला बिरुद पुसून

प्रकाशित पणती झाली...


भेदल्या सामाजिक रूढी

सावित्रींच्या पावलावर पाऊल,

परंपरांचा छेदत विळखा

उज्वल उद्याची चाहूल


Rate this content
Log in