तिचे हास्य....
तिचे हास्य....
1 min
461
तिचे मोहक, लोभस हास्य
जशी हवेची झुळूक मंद
परिपूर्ण निरागसतेने
पेरते ते आनंद।।१।।
तिचे ते छानसे हास्य
एक जादूचं वाटते मला
अन् म्हणूनच आपल्यातल्या जादूई शक्तीने
त्याने प्रभावित केले जगताला।।२।।
तिचे ते मोहक हसणे
म्हणजे एक पर्वणीच असते
त्याची परिणीती अवतीभवती
प्रसन्न वातावरणाच्या रुपात दिसते।।३।।
मज खात्री आहे
चाहते तिचेअनेक असतील
अन् भविष्यात ते आणखीनचं
वाढलेले हो दिसतील।।४।।
तिचे ते हास्य
असेच राहो टिकून
प्रार्थना मी करतो
भगवंताकडे अगदी वाकून।।५।।
