श्रीराम स्तुती....
श्रीराम स्तुती....
1 min
342
श्रीराम आमुची अस्मिता
श्रीराम आदर्श आमुचे राव
पुजितो आम्ही श्रीरामांना
ठेवुनी ह्रदयी मोठा भाव।।१।।
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम
आमुची असती मोठी शान
त्यांच्या केवळ स्मरणाने
टळत असते मोठी हान।।२।।
श्रीराम आमुचे गुरु
तेच असती आमुचे आदर्श
आदर्शांचे तयांच्या पालन करत
साधू आम्ही आमुचा उत्कर्ष।।३।।
श्रीरामांची लेकरे आम्ही
त्यांचे पाईक हीच आमुची ओळख
त्यांच्याशिवाय आमुचे अस्तित्वचं नाही
हे सत्य असे अगदी ठळक।।४।।
आम्ही सारे अंश तयांचे
करु जीवाचे रान
अन् आदर्शावर तयांच्या अचूकपणे चालत
गुणगाण त्यांचे गाऊ छान।।५।।
