STORYMIRROR

Atul Shirude

Others

4  

Atul Shirude

Others

निरागस प्रेम.....

निरागस प्रेम.....

1 min
742

प्रेम....


प्रेमवीर आले

प्रेमवीर गेले

अपेक्षारहीत प्रेमी

मात्र स्मरणात राहिले।।१।।


हिर-रांझा, लैला-मजनु

यांचा आदर्श घेऊन

अगदी मनापासून

प्रेम पाहावे करुन।।२।।


प्रेम करावे

प्रेमात पडावे

अन् जबाबदारीने ते

निभावूनही न्यावे।।३।।


ध्यानी घ्यावे

करता विचारपूर्वक प्रेम

त्याचा मग प्रेमभंगरुपी

होत नाही गेम।।४।।


प्रेमाची व्याप्ती

दूरपर्यंत असते

तिरस्काराला तिथे

जागाचं नसते।।५।।


जीवनात चांगले

अन् निस्वार्थी बनण्याहेतु

एकदातरी प्रेम करावे

न ठेवता किंतु-परंतु।।६।।



Rate this content
Log in