Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Patil

Others

2  

Sangita Patil

Others

थोड्‌याच वेळात.

थोड्‌याच वेळात.

1 min
6.8K


मावळतीचा रक्तकेशरी सूर्य

विलीन होईल दिगंतात थोड्याच वेळात

तिमिरात मग राज्य असेल

शितल त्या चंद्राचे,

पंचप्राण ओवाळतील त्यावर

असंख्य धुंद तारका

थोड्याच वेळात.

आकाशाच्या पूर्व किना-यावर

हळूच एक लकेर उमटेल

सप्तरंगी धुंद किरणांची

 प्रसूत होईल एक नवी पहाट

थोड्याच वेळानी.

तेव्हा प्रिये, सुखाच्या या शवावर

उगाच अश्रु ढाळीत बसू नकोस

तर, स्वत:तच जन्म घे

पुन्हा एकदा कारण,

हा जन्मही आता संपणार आहे

थोड्याच वेळात.


Rate this content
Log in