Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sangita Patil

Others

3  

Sangita Patil

Others

"माझी कविता"

"माझी कविता"

1 min
8.4K


माझ्या कवितेवर मला, विचार करावा वाटतो |

जास्त नाही पण थोडा, थोडा करावा वाटतो ||


मी भावना लिहावया, शब्दांचा पसारा मांडला |

आता जरा जरासा, तोल सावरावा वाटतो ||


आहे अशी ती मुक्त, न कळे अलंकार नि वृत्त |

आता मला तिचाही श्रृंगार करावा वाटतो ||


तिने प्रसविले मला, एका नव्याच विश्वात |

तिच्या प्रसूतिचा आता, सोहळा करावा वाटतो ||


तिच्यामुळेच होते, कौतुक इथे माझे |

आता मला तिचाही, सत्कार करावा वाटतो ||


जास्त नाही पण थोडा, थोडा करावा वाटतो ||

माझ्या कवितेवर मला विचार करावा वाटतो ||


Rate this content
Log in