Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Patil

Others

2  

Sangita Patil

Others

"थोड्‌याच वेळात ......"

"थोड्‌याच वेळात ......"

1 min
1.4K


मावळतीचा रक्तकेशरी सूर्य विलीन होईल

दिगंतात थोड्याच वेळात

तिमिरात मग राज्य असेल शितल त्या चंद्राचे

पंचप्राण ओवाळतील त्यावर असंख्य धुंद तारका थोड्याच वेळात

आकाशाच्या पूर्व किना-यावर हळूच एक लकेर

उमटेल सप्तरंगी धुंद किरणांची आणि प्रसूत होईल

एक नवी पहाट थोड्याच वेळात

तेव्हा प्रिये, सुखाच्या या शवावर उगाच अश्रु ढाळीत बसू नकोस,

स्वत:तच जन्म घे पुन्हा एकदा कारण, हा जन्म ही आता संपणार आहे थोड्याच वेळात


Rate this content
Log in