थेंब
थेंब
1 min
28.8K
थेंब पावसाचे पिऊन
आली लिली ग फुलून
हिरव्या पानांच्या आडून
गेली गुज ग सांगून
थेंब सरींचे झेलून
चिंब गेली ग भिजून
शुभ्र पाकळ्यामधून
पराग येती डोकावून
थेंब जाता ग स्पर्शून
लिली येई मोहरून
शहारता पान पान
थेंब जाई ओघळून
थेंब आभाळाचं देणं
गाई आनंदाचं गाणं
लिलीसंगे रमे मन
आलय दोघांना उधाण
