हिरवाई
हिरवाई
1 min
27.8K
तप्त मातीत कोरड्या
सल खोलवर काही
काळ्या मातीची ढेकळं
वाट पावसाची पाही
निळ्या नभांना सारत
लाट मेघांची या येई
धरणीला भिजवाया
थेंब बरसत राही
मातीचा कण कण
धारांतून चिंब होई
मृदगंधाने मोहीत
सारे आसमंत होई
भेट दोघांचीही होता
घडे नवी नवलाई
साऱ्या सृष्टीत चैतन्य
चहूकडे हिरवाई
चहूकडे हिरवाई
