स्वप्न एका भावाचं
स्वप्न एका भावाचं
आज मी पहिल्यांदाच ताईच्या गावी तिला भेटायला गेलो होतो
बगताच क्षणी तिला मी अगदी आनंदाने भारावून गेलो होतो
तिला बघितल्यावर डोळ्यातून माझा अश्रु बाहेर येत होते
कारण ती मला मी तिला पहिल्यादाच भेटले होते
आई होती बाबा होते आणि माणशी बहीण होती लहान
ताईला रडत मीठी मारली राहल नाही मला त्याच भान
तिच्या मीठीत मला थोडं हलक वाटत होत
टेंशन सर्वे विसरून मला शांत वाटत होत
येवढ झाल्यावर ताई म्हणाली पागल दारात उभा का?
फ्रेश होऊन घे आणि सांग मला प्रवासात त्रास झाला नाही ना?
थोडं बोलून झाल्यावर ताईने दिलं मला खाऊ
थकलाच कारे सिद्धू तु चल गुपचुप झोप पाहू
असं म्हणतं ताईनं माझं डोकं तिच्या मांडीवर घातलं होत
मी ही ताईच्या मायेच्या छायेत शांत निजुन गेलो होतो.
बहीणच हे प्रेम पाहून माझा डोळ्यातमधुन अश्रुचा धारा वाहत होत्या
सकाळी उठल्याबरोबर मी सैरावैरा पाहू लागलो होतो
बघतो तर ताई नव्हतीच तिथे माझी, मी स्वप्न बगत होतो
