STORYMIRROR

Archana Murugkar

Others

4  

Archana Murugkar

Others

जागवावी स्त्रीशक्ती

जागवावी स्त्रीशक्ती

1 min
182

असे आदिम स्त्रीशक्ती

जगा इतकी जगात

नका समजू कस्पट

तिला कधीही स्वप्नात


झाले अनंत बदल

तरी तिची सत्ता मोठी

आदिमाया जगदंबा

तिला वंदी जगजेठी


दिली दाखवून तिने

उर्जा साऱ्या जमान्यात

उमा, जान्हवी, सावित्री

मुक्ता, लक्ष्मी, जिजाईत


भ्रूणहत्या बलात्कार

साक्ष देती दुष्टतेची

आहे गरज समाजा

त्रिशूलाच्या कालिकेची


घरोघरी जागवावी

समानता शिक्षणाची

संविधान अधिकार

गुरूकिल्ली स्त्रीशक्तीची.


Rate this content
Log in