STORYMIRROR

ashruba kothawale

Inspirational Others

4.0  

ashruba kothawale

Inspirational Others

स्त्री

स्त्री

1 min
79


न्हावून धुवून आरशासमोर

उभी राहून

मोकळ्या केसातून टपकणारे पाणी

टॉवेलने पुसून 

आपल्याच सौंदर्याला

निरखून पाहणारी

स्वतःशीच मुक्तपणे संवाद करणारी, स्त्री...


अनेक भूमिका साकारत 

सर्व अंबट-गोड नाती

जिवापाड जपत

असंख्य संकटांचा सामना करत

कुटुंबाचा गाडा ओढणारी

मेहनती कर्तुत्ववान 

अविरत प्रयत्नशील असणारी, स्त्री...


वाऱ्यासारख्या सुसाट 

मनाला आवर घालत

कौमार्याला जपत

शीलाचे रक्षण करत

अनेक भावनांची आहुती देत

मुलांच्या शिक्षणासाठी

दुःखाला सोबत घेऊन

हसत मुखाने राहणारी, स्त्री...


मायेनी खाऊ घालत

संसाररुपी सागराला तारणारी

झाशी जिजाऊ होऊन लढणारी

रात्रंदिवस कष्ट उपसणारी, स्त्री...


आपला व पतीचा

स्वाभिमान जपणारी

समस्येचा पहाडी डोंगर

समोर दिसत असताना

कधी न हार मानणारी, स्त्री...


Rate this content
Log in

More marathi poem from ashruba kothawale