STORYMIRROR

ashruba kothawale

Others

4  

ashruba kothawale

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
81


या शेताचा हा धनी

गातो मंजुळ गाणी

हिरवा शालू, नेसता

तू दिसते, फुलराणी

मी चंद्र आहे, ना तुझा

तु चंद्राची, चांदणी   

या शेताचा हा धनी    

गातो मंजुळ गाणी

चालतेस ठुमकत,

जेव्हा पिक बघत टवकारुनी

वारा गातो, झुळझळ गाणी

तू या राजाची, ग राणी     

या शेताचा हा धनी     

गातो मंजुळ गाणी

दोन वाघाची, ती जोड

ओढती तिफन, जोमानी

मैना मागे, सोडती खत

राघू करतो या, पेरणी      

या शेताचा हा धनी      

गातो मंजुळ गाणी

कोंब येता, तरारून

पाटात पळतया, ग पाणी

सपान येत या, फुलून

शिवार नाचे, आनंदानी       

या शेताचा हा धनी        

गातो मंजुळ गाणी

काळया मातीचा, पुजारी

वाटे विठ्ठला वाणी

तू शोभून दिसते सया

धन्याची तू रुक्मिणी      

या शेताचा हा धनी      

गातो मंजुळ गाणी


Rate this content
Log in

More marathi poem from ashruba kothawale